ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध!

167

🔺संबंधित हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करा,युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद,तालुका प्रतिनिधी)

पुसद(दि.13फेब्रुवारी):-राष्ट्र सेवा दलाने ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात‘निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चार चाकी वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करुन पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावा यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसद च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲड.असिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असतांना हल्लेखोरानी अतिशय क्रुरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत स्वतःचा व वरील सर्व व्यक्तींचा बचाव केला. या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार बांधव करत आहेत. त्याच प्रमाणे युवा ग्रामीण पत्रकार संघ यवतमाळ व पुसद तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्ले खोरावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

सदर निवेदन देते वेळेस, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे यवतमाळ सचिव राजेश सोनुने ,पुसद तालुकाध्यक्ष राजू राठोड, पुसद ग्रामीण अध्यक्ष राजेश ढोले, सचिव कुलदीप सुरोसे, शहराध्यक्ष ऋषिकेश जोगदंडे संघटक ज्ञानेश्वर मेटकर, सहसंघटक कैलास श्रावणे,मारोतराव कांबळे, संपर्क प्रमुख विजय निखाते, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सवंगडे, पोलीस पाटील बापूराव कांबळे इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत.