सातारा जि. प. झिरो पेंडन्सी मधून हुकलेल्या कामाची होऊ लागली उजळणी

97

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13फेब्रुवारी):- सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली झाली. त्यांच्या कामकाजामध्ये झिरो पेंडन्सी असा उल्लेख केला जातो. आता नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी पदी याशनी नागराजन यांची नियुक्ती झालेली आहे. आता त्यांच्याकडे झिरो पेंडन्सी मधून हुकलेल्या अनेक कामे घेऊन सातारा जिल्हा परिषदेमध्ये लोक गाऱ्हाणी मांडू लागलेली आहेत. याची आता चर्चा होऊ लागलेली आहे.

याबाबत माहिती अशी की खटाव तालुक्यातील तरसवाडी जिल्हा सातारा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला सलग तेरा वर्ष एकच गावात काम करण्याची संधी मिळाली. वास्तविक पाहता शासकीय नियमानुसार तीन अथवा पाच वर्षांनी बदली केली जाते. परंतु, तरसवाडी येथील ग्रामसेवक गेले तेरा वर्ष त्याच जागी असल्यामुळे त्यांच्या कामकाजात अनियमितता येऊ लागलेली आहे. अशी तक्रार करून दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी तक्रार केली होती.

या तक्रारीची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्याचीही पोहोच असून सुद्धा तीन महिने यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मग ,असे असताना एखाद्या अधिकाऱ्याबाबत काही माध्यमातून झिरो पेंडन्सी हा उल्लेख म्हणजे त्यांच्या समस्यांचा निपटारा न करता अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र दिले आहे. हे अनेकांना खटकू लागलेले आहे .

मुळातच अनेक गावातील ग्रामपंचायती कारभाराबाबत लेखी तक्रारी करून लोकशाही मार्गाने आंदोलन झाली आहेत.गाऱ्हाणी मांडली जातात. परंतु त्याचा कधीही निपटार होत नाही. कारवाई होत नाही. पण, कारवाईच्या भीतीपोटी अनेकांना चौकशीला सामोरे जावे लागते. या चौकशीतून नेमके काय अहवाल येतो? हा कधीही उघड होत नाही. ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे.
अलीकडच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलले असल्याने एक हाती कारभार आहे. या कारभारला कंटाळलेले लोक काही माध्यमातून आपलेच दात व आपलेच ओठ असे समजून बोटचेपीचे धोरण आखले जाते. त्यामुळे आता अनेकांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

जिल्हा परिषद कामगार संघटनेचे एक नेते अजित वाघमारे यांनी थेट अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर आंदोलन केले. या ठिकाणी माध्यमाचे प्रतिनिधी नियमितपणे भेट देतात .पण ही बातमी प्रसिद्ध करावी. असे त्यांना वाटले नाही. शेवटी खालेल्या मिठाला जागलेच पाहिजे. अशी अपेक्षा सभासद करत असल्याने नेत्यांना आंदोलन करावे लागते. हे आंदोलन झाले आता यातून काय निष्पन्न झाले. हे येणारा काळच ठरवेल.

सातारा जिल्हा परिषदेबाबत वाढत्या तक्रारी येत असल्याने झिरो पेंडन्सी कशाला म्हणावे ? यासाठी अभ्यास वर्ग घ्यावा. कार्यशाळा भरवावी. प्रशिक्षण घ्यावे. अशी मागणी पुढे आलेले आहे. दरम्यान, तरसवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार व ग्रामस्थ रामचंद्र पवार यांनी भाजपचे वरिष्ठ नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित ग्रामसेवकाची बदली केली जाईल. असे सांगून झिरो पेंडन्सी कशाला म्हणतात ? याचे उदाहरण दाखवून दिल्याबद्दल युवा नेते श्री अनिल देसाई यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.