कुटुंब लाभ योजनेतील वयाची जाचक अट शिथिल करण्याची लाभार्थी यांची मागणी

182

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17फेब्रुवारी):- राष्ट्रीय कुटुंब लाभ
या योजनेसाठी राज्य शासन दरवर्षी 45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करते. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा आर्थिक विकास होऊन ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल परंतु या योजनेतील असणारी 18-59 वयाची जाचक अट शिथिल करण्याची मागणी लाभार्थी कडून होत आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राज्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील स्त्री/पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास अर्थसहाय्य देण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

गरीब कुटुंबात कमावती व्यक्तीवर सर्व कुटुंबाचे जीवन अवलंबून असते त्यामुळे अशा कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा एकाएकी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण होते या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या स्त्री, मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक रकमी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते परंतु जि शासनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वयाची अट 59 केली आहे ती जाचक असून ती शिथिल करावी आणि सरसकट लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी लाभार्थी यांच्याकडून जोर धरू लागली आहे.

ही मागणी मान्य व्हावी अशी लाभार्थी यांची इच्छा आहे परंतु शासन या योजनामध्ये जाचक अटी घालून जसे कि मयत व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा मागत आहे हा पुरावा नसेल तर लाभार्थी लाभपासुन वंचित राहतोय त्यामुळे शासनाने सरसकट सर्वांनांच या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी लाभर्थ्यांची आहे.