मांडवा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

115

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19फेब्रुवारी):-तालुक्यातील मांडवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वीजयंती ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच अल्का ढोले ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विजय राठोड ,पोलीस पाटील दत्तराव पुलाते, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, साहेबराव ढोले,ग्रा.पं.गोपाल मंदाडे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष धम्मदिप ढोले, ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष बजरंग पुलाते,उपाध्यक्ष समाधान आबाळे,हे उपस्थित होते.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या वतीने ग्राम परिवर्तन समिती मांडवा २०२४च्या अध्यक्षपदी सुनिल आडे तर उपाध्यक्ष म्हणून बजरंग राठोड यांची निवड करण्यात आली.तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मांडवा वैष्णवी जयस्वाल जिल्हास्तर महादीप परीक्षेसाठी पात्र ठरली आहे.तसेच मोनिका ढोले. NMMSच्या (स्कॉलरशिपच्या)परिक्षेत पात्र ठरली आहे. या दोन्ही विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ ,शाल,रोपटे देऊन सत्कार व त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सुदाम ढोले, नथ्थु ढोले,रमेश ढोले,कैलास राठोड,विठ्ठल आडे,संतोष आबाळे, देविदास गजभार, गजानन आबाळे,प्रमोद पुलाते,अविनाश आबाळे,रामदास वानखेडे, राहुल जाधव,कार्तिक धाड, ज्ञानेश्वर पुलाते,बंटी आबाळे, ग्रा.पं. कर्मचारी प्रदुम्न आबाळे , तसेच प्रतिष्ठित नागरिक व इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग राठोड यांनी केले तर आभार समाधान आबाळे यांनी मानले.