संत रविदास जयंती निमित्त २४ रोजी दीपनगर येथे व्याख्यानाचे आयोजन

68

✒️भुसावळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

भुसावळ(दि.20फेब्रुवारी):- श्री संत शिरोमणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिति , दीपनगर तर्फे दिनांक २४ फेब्रूवारी २०२४ रोजी नवीन क्लब , दीपनगर येथे सकाळी १०.३० वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता मोहन आव्हाड , मुख्य अतिथि आमदार संजय सावकारे तर व्याख्याते म्हणून प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ उपस्थित राहणार आहेत .

या कार्यक्रमास राजेंद्र बावस्कर , रविंद्र सोनकुसरे , मनोहरराव तायडे , अशोक भगत , मुकेश मेश्राम , रविंद्र डांगे आदिंसह काही अधिकारी मोठ्या संखेने हजर राहणार आहेत .

संत रविदास यांच्या विविध विचारांवर तसेच कार्यावर जयसिंग वाघ हे आपले विचार मांडनार आहेत , या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संखेने हजर रहावे असे आवाहन समिति तर्फे करण्यात आले आहे .