NMMS स्कॉलरशिप परीक्षेत ने. ही. कन्या विद्यालय ब्रम्हपुरी चे सुयश

690

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS स्कॉलरशिप परीक्षेचा सत्र 2023 – 24 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यामध्ये नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालय, ब्रह्मपुरी येथील 23 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे तसेच बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे.

यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली मार्फत ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. सदर विद्यालयात वर्षभर NMMS परीक्षेचे वर्ग नियमितपणे घेऊन त्यांना मार्गदर्शन देण्यात येते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय श्रीमती स्नेहलताताई भैय्या, संस्थेचे सचिव श्री. अशोकजी भैय्या साहेब तथा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रभा बनपूरकर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. विनोद भैय्या सर, पर्यवेक्षक श्री. निखारे सर तथा सर्व शिक्षक शिक्षिका कडून विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.