257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम पूर्ण

136

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.29फेब्रुवारी):-जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघात ईव्हीएम जनजागृती मोहीम पूर्ण झाली असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली.

कोरेगाव 147 मतदान केंद्र सातारा तालुक्यातील 128 मतदान केंद्र तर खटाव तालुक्यातील 80 मतदान केंद्र अशा एकूण 355 मतदान केंद्रातून 197 ठिकाणी ईव्हीएम जनजागृती मोहीम गेल्या दोन महिन्यापासून चालू असून ती यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती यावेळी तहसीलदार यांनी दिली.

तहसीलदार कार्यालय मध्ये येणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्यासाठी माहिती पुरवण्यात येत होती ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करताना अनावश्यक भीती वाटते त्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष मतदान करून आपण केलेले मतदान योग्य ठिकाणी जाते की नाही हे प्रत्यक्ष पहात रहा येत होती. व आपणाला संशय येत असेल तर त्याची प्रिंट देखील निघत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी कोणी कोणी आपला यात सहभाग नोंदवला त्याची नोंदवही देखील ठेवण्यात आली.