आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूरच्या अध्यक्ष पदी सरोज चौधरी तर उपाध्यक्ष रुपाली नन्नावरे यांची बिनविरोध निवड

182

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3मार्च):-आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूरच्या अध्यक्ष पदी सरोज चौधरी तर उपाध्यक्ष पदावर रुपाली नन्नावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दिनांक 3 मार्च रोजी आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूर ची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये सरोज चौधरी यांची अध्यक्ष तर रुपाली नन्नावरे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध झाली.

संचालक म्हणून गुणवंत वाघमारे, संदीप धारणे ,राकेश जीवतोडे , प्रकाश जांभुळे, विनोद नानवटकर, संकेत सूर्यवंशी, आकाश चौधरी, केशव गजभे, शरयू दडमल उपस्थित होते.