बिबट्याच्या हल्ल्यात चार गायीं ठार:मांडवा शिवारातील घटना

386

🔸शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि 3मार्च):-शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या फुलवाडी बिट मधील मांडवा शिवारात काल बिबट्याने केलेल्या हल्यात चार गायी ठार झाल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   याबाबत पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या फुलवाडी बिट मधील मांडवा गावानजीक असलेल्या जंगल शिवारात काल सकाळी मांडवा येथील गायीचा कळप चरण्यासाठी गेला होता. त्यावेळी या जंगलात असणाऱ्या बिबट्यांनी या गायीवर हल्ला केला आणि त्यात मांडवा येथील प्रमोद पुलाते, शिवाजी वानखेडे, संतोष आबाळे, विश्वांबर दाढे यांच्या चार गायीवर बिबट्याने चढविलेल्या हल्यात चार गायी ठार झाल्या.

याबाबतची उशीरा माहिती मांडवा येथील शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी शेंबाळपिंपरी वनविभागाला सुचना केली त्यावरुन वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्र झाल्याने त्यांनी सकाळी संपुर्ण परिसर पिंजून काढला त्यात चार गायी ठार झाल्याची माहिती समोर आली. शेंबाळपिंपरी वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्य गायीचे शवविच्छेदन केले. गायींवर हल्ला करणारा हा बिबट्याचा कळप असावा असा अंदाज व्यक्त केला गेला असुन या प्रकाराने शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.