जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न….!

112

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : माता रमाई महिला मंडळ,माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह, तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला विशेष प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ऍड धनश्री मोतलिंग मॅडम (कायदेशीर सल्लागार बहुजन मुक्ती पार्टी सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाची अध्यक्षता मा.इंजि तुषार मोतलिंग सर (प्रदेश सचिव बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य) यांनी केली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.चेतन आवडे (उपाध्यक्ष तक्षशिला सामाजिक सेवा संस्था) यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.अनुराधा चव्हाण मॅडम (माजी सदस्या ग्रामपंचायत सातारारोड पाडळी) मा.सतिश गायकवाड सर (सदस्य बामसेफ सातारा) मा.ऍड तेजस माने सर (वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सातारा तथा जिल्हा संयोजक ILPA सातारा) मा.ऋषिकेश वाघडोळे सर (कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कोरेगाव)मा.मेघा गायकवाड मॅडम (मुख्याध्यापिका कन्या शाळा रहिमतपुर)वरील वक्त्यांनी वर्तमानातील परिस्थितीत महिलांच्या विविध ज्वलंत समस्यांवर सखोल असे मार्गदर्शन केले तसेच विशेष उपस्थिती मा.डाॅ.संजय आवडे (माजी सरपंच सातारारोड पाडळी) मा.संदीप आवडे (तालुका अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी कोरेगाव) मा.सिध्दांत आवडे (शहर अध्यक्ष इंजिनिअरिंग कृती समिती सातारा) हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक मा.नालंदा आवडे (अध्यक्षा माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह) मा.स्वाती आवडे (अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ) मा.सारिका आवडे (उपाध्यक्ष माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह) मा.चित्रा काळे (उपाध्यक्ष माता रमाई महिला मंडळ) मा.काजोल आवडे (उपाध्यक्ष माता रमाई महिला मंडळ यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले तसेच कार्यक्रम संयोजक मा.श्रीकांत आवडे (अध्यक्ष तक्षशिला नवतरुण मंडळ) मा.प्रज्वल आवडे (अध्यक्ष तक्षशिला सामाजिक सेवा संस्था) मा.महेश आवडे (कार्यवाहक तक्षशिला नवतरुण मंडळ) मा.प्रमोद काळे (सह – कार्यवाहक तक्षशिला नवतरुण मंडळ) इ. असणार आहेत तसेच माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा मा.स्वाती आवडे यांनी बहुजन समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती दाखविल्याबद्दल सर्व महिला सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.