सुटकेस शाळेचे प्रौढ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत हॉल तिकीट मुख्याध्यापकाच्या सही विनाच 

40

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेडः
गंगाखेड शहर व तालुक्यातील बऱ्याच वर्षापासून बंद असलेल्या सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा व मागासवर्गीय प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा मैराळ सावंगी या सुटकेस शाळेतील प्रौढ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले आहेत तर हॉल तिकीटावर मुख्यधापक यांची सही नसून, शाळा बंद आसताना परीक्षेत बोगस विद्यार्थी बसवणाऱ्या मुख्याध्यापक संस्थाचालकावर कारवाई सह गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे यांनी केली आहे.

शिक्षण मंञी, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण समाज कल्याण आयुक्त, जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात गंगाखेड तालुक्यात शासन मान्य महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती, नव बौद्ध निवासी शाळा योजना अंतर्गत शालिग्राम शिक्षण व समाज कल्याण संस्था शेळगाव संचलित सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा जायकवाडी वसाहत गंगाखेड व मैराळ सांवगी येथील मागासवर्गीय प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा मागील अनेक वर्षापासून बंद आहेत. केवळ कागदोपञी सुरू आसून या दोन्ही शाळा एकाच इंडेक्स नंबरने सुरू आहेत. या शाळेत कधीच विद्यार्थी शिक्षण घेताना आढळून येत नाहीत. शाळेची मान्यताच बनावट तयार करून मंञालयाची फसवणूक केली आहे. या सुटकेस शाळेने
फक्त दहावी वर्गात परीक्षेच्या काळात पर जिल्ह्यातील प्रौढ विद्यार्थी विद्यार्थ्यांना दहावी पास, वय कमी व डमी विद्यार्थी बसवून पासच्या हमीवर व दुसऱ्यांदा दहावीला फ्रेश प्रवेश दाखवून हमीवर वेगवेगळे पैशाच्या दरानुसार परीक्षेत बसविले जाते. अस्तित्वात नसलेल्या सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा गंगाखेड व मागासवर्गीय प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा मैराळ सावंगी या दोन्ही शाळेची चौकशी यापूर्वीच गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांनी करून तपासणी अहवालात या दोन्ही शाळा बंद असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण परभणी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी व एस.एस.सी. बोर्ड औरंगाबाद यांना कळवले आहे. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी यांनी वेळोवेळी या शाळा तपासणीसाठी नेमलेल्या पथकाने सुद्धा सदरील दोन्ही शाळा बंद असल्याचा अहवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर केला आहे. तसेच वेळोवेळी केलेल्या तक्रारीमध्ये एस.एस.सी. बोर्डाला सन 2023 -2024 या दोन्ही शाळांच्या दहावी बोर्डाची मंडळ मान्यता व इंडेक्स नंबर तात्काळ रद्द करुन, बंद करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व गैरमार्गी होणारे नुकसान टाळावे व हा आर्थिक हव्यासातून चालणारा बोगस धंदा बंद करावा असे कळविले असताना सुद्धा चालू शैक्षणिक वर्षात फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा गंगाखेड व मागासवर्गीय प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा मैराळ सावंगी यांनी शासनाची फसवणूक करून शाळा अस्तित्वात नसताना इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये गैर मार्गाने गंगाखेड शहरातील चार ही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी बसवून फसवणूक केल्याप्रकरणी या दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व संस्था संचालक यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सुभाष शिंदे यांनी केली आहे.