ब्राम्हण बांधवांनो, जातीतल्या विकृतांना आवरा आणि माणूसपणाची चळवळ उभी करा !

462

 

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006

मराठा आरक्षणाच्या लढाईची कोंडी व मुस्कटदाबी करणा-या देवेंद्र फडणवीसांच्यावर मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. सामान्य मराठा समाजात त्यांच्याबद्दल तीव्र संताप आहे. या संतापाचाच परिणाम म्हणून परवा किंचक नवले या तरूणाने अतिशय उद्वेगाने फडणवीसांचा माज उतरवण्याची व तीन मिनिटात संपुर्ण ब्राम्हण जात संपवण्याची धमकी दिली. खरेतर सदर तरूणाने दिलेली धमकी ही उद्वेगातून आलेली प्रतिक्रीया आहे. त्याच्या या धमकीचे समर्थन होवूच शकत नाही पण तो गुन्हेगार नाही. तो थंड डोक्याचा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही. तो आपले हक्क मागण्यासाठी लढतो आहे. ते मिळत नाहीत, दडपलं जातय, झिडकारलं जातय आणि खेळवलं जातय याच्या चिडीने अस्वस्थ झालाय. त्याच अस्वस्थ झालेल्या मनातून त्याने सदरचे वक्तव्य केले आहे. त्याच्यात जर खरच तसा द्वेष किंवा तिरस्कार असता तर यापुर्वीच त्याने पाच-दहा ब्राम्हणांची डोकी फोडलेली असती किंवा चार-चौघांचे बळी तरी घेतले असते. पण त्याच्याकडून असं काहीच झालेले नाही. त्याची ती तात्कालीक प्रतिक्रीया होती. तो अस्वस्थ मनाचा उद्वेग, असंतोष होता. त्याच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात प्रचंड वादंग उठले. विधानसभेत त्यावर खडाजंगी झाली. ब्राम्हण समाजातूनही तीव्र संताप व्यक्त झाला. सदर तरूणाला तातडीने अटक करावयास लावली गेली. तो कालच जामिनावर बाहेर आला. यापुर्वी संभाजी भिडेंनी संपुर्ण मुसलमान नष्ट करण्याची भाषा अनेकवेळा केली पण त्यांच्या विरोधात विधानसभा कधीच अशी संतापलेली दिसली नाही. त्यांना कधी अटक करायला इथली व्यवस्था सरसावली नाही. २१ वेळा क्षत्रियांचा नायनाट केल्याच्या, त्यांचा बिमोड केल्याच्या बाता इथं अभिमानाने मारल्या जातात. बाया-मुले मारणा-या, गर्भवती महिलांच्या पोटातल्या बाळासह त्यांची हत्या करणा-या, स्वत:च्या आईचे मुंडके उडवणा-या नराधम परशूरामाला दैवत्व दैणा-या, त्याला आयडॉल समजणा-या समाजाला खरेतर किंचक नवलेचं वक्तव्य झोंबण्याची गरज नाही. किंचक नवले जामिनावर आल्यावर त्याच्या गावात त्याचे जंगी स्वागतही झाले. पण या निमित्ताने महाराष्ट्रातील सुज्ञ, विवेकी, विचारी आणि व्यापक मनाच्या ब्राम्हण बांधवांनी चिंतन करायला हवे, आत्मपरिक्षण करायला हवे. आपल्या समाजातील वाढता उग्रवाद आणि विकृत जातीयवाद थोपवायला हवा. गेल्या काही वर्षात ब्राम्हण समाजात टोकाची कट्टरता वाढलेली दिसते आहे. दिल्लीत मोदींचे सरकार व राज्यात फडणवीसांच्या हातात सत्तेची सगळी सुत्र आल्यापासून ब्राम्हण समाजातील विकृतांचा हैदोस सुरु आहे. ते समाज माध्यमात अतिशय भयंकर पध्दतीने व्यक्त होतात. त्यांच्या व्यक्त होण्यातला जातीयवादी उन्माद पराकोटीचा व किळसवाना आहे. आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही. असा अविर्भाव आणि अहं त्यांच्यात ठासून भरला आहे. हा उन्माद महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर समाजांना जाणवतो आहे. इतर समाजाचे लोक या जातीयवादाच्या विरोधात बोलतानाही दिसतात. किंचक नवले उद्वेगाने जरी बोलला असला तरी त्याने लोकांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. देश आणि राज्य ताब्यात आल्यापासून महाराष्ट्रातला काही ब्राम्हण वर्ग पुन्हा पेशवाई आल्याच्या व आम्हीच इथले मालक आहोत, आम्हीच इथले भूदेव आहोत या पुरातन मस्तीत वावरताना व बोलताना दिसतो आहे. सातत्याने या ब्राम्हण्यवादी उन्मादाचा अतिरेक पहायला मिळतो आहे. हा पराकोटीचा उन्माद व जातीयवाद माणूस म्हणून जगताना ठिक नाही. केतकी चितळे, शरद पोंक्षे सारखे अनेक विकृत लोक या पध्दतीचा उन्माद करताना दिसतात. समाज माध्यमात तर या उन्मादाला उत आलेला असतो. वेळीच या उन्मादाला आवर नाही घातला तर नक्कीच काही अघटीत घडू शकतं. किचक नवले जे बोलला आहे ती खदखद आहे. या निमित्तान ब्राम्हण समाजात यावर चिंतन झालं तर बरं होईल.

देशात कुठल्याच राज्यात महाराष्ट्राइतके ब्राम्हण जातीयवादी नाहीत. महाराष्ट्रात या जातीयवादाने टोक गाठले आहे. ही उन्मादी जातीयवादाची परंपरा आजची नाही, तर ती पुरातन आहे. इतिहासात याचे दाखले पानापानावर सापडतात. याच जातीयवादाच्या छळछावणीला अनेक महापुरूषांना सामोरं जावं लागलं. शिवाजी महाराजांचीही यातून सुटका झाली नाही. अनेक महापुरूषांना तर जिवानीशी जावं लागलं. जीवानिशी जावं लागलेल्या महापुरूषांची यादी खुप मोठी आहे. काळ बदलला आहे, सगळी पुराणातली थोतांडं लोकांच्या लक्षात यायला लागली आहेत. या देशातल्या ब्राम्हणेतर समाजावर ब्राम्हणांनी हजारो वर्षे राज्य केले. त्यांच्याइतके शोषण मोघल, डच, पोर्तूगिज व इंग्रजांनीही केले नाही. वर्ण व्यवस्थेच्या जातीय उतरंडीत त्यांनी सर्वात उच्च स्थान मिळवले. ते कायम ठेवण्यासाठी कपोलकल्पीत पुराणं व पोथ्या निर्माण केल्या. तेवढ्यासाठी पुरूष असणा-या ब्रम्हदेवाला अंगा-अंगातून बाळंत केले. तमाम समाजाला शिक्षणाचे हक्क नाकारून त्यांना अडाणी ठेवले. मंत्रा-तंत्रांचे अवास्तव स्तोम माजवत देव आमच्या अंकीत आहेत. आम्हीच या भूलोकीचे भूदेव आहोत असलं थोतांड पसरवले. हा जातीयवादी उन्माद इतका भयंकर आहे की माधवराव गोळवळकरांनी तर सगळ्या महिलांचे पहिले अपत्य हे नंबूद्रीपाद ब्राम्हणापासून व्हायला पाहिजे असे सांगितले. तसे झाले तरच वंश शुध्द होतील असे म्हंटले. याचा सरळ सरळ अर्थ असा की इतर जातीच्या सर्व स्त्रीया संभोगासाठी नंबुद्रीपाद ब्राम्हणांच्याकडे यायला हव्यात व त्यांच्यापासून त्यांचा वंशशुध्द व्हायला हवा. असल्या उन्मादी व सत्तापिपासू प्रवृत्तीतूनच महात्मा गांधीचा खून करवला गेला. या खूनामागे पाकला द्यावे लागणारे पंच्चावन कोटी किंवा हिदूत्व वगैरे काही नव्हते. हे थोतांड आहे. इंग्रज आले आणि पेशवाई गेली. इंग्रज गेल्यावरही पुन्हा पेशवाईच यायला हवी. आमचेच राज्य होते आणि ते पुन्हा यायला हवे. अशा मानसिकतेतूनच महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. आता काळ बदलला आहे. माणसाने अश्मयुगापासून सुरू केलेला प्रवास विज्ञान युगापर्यंत पोहोचला आहे. या जगात आत्तापर्यंत अनेक वंश आले गेले, अनेक सत्ता आल्या व गेल्या. अनेक चक्रवर्ती सम्राटही काळाच्या पोटात गडप झाले. अनेक मानवी वसाहती, वंश नावालाही शिल्लक राहिले नाहीत. असे असताना ब्राम्हण जातीतल्या काही जातीयवादी विकृतांनी माणूस व्हायचा प्रयत्न करायला हवा. काळाच्या ओघात काही उरत नाही. सगळे त्याच्या उदरात गडप होते. सगळ्या सत्ता, सत्ताधीशही त्याच उदरात गडप होतात. रामाचे राज्य गेले. कृष्णाची द्वारका बुडाली. रावणाची सोन्याची लंका लयाला गेली. एक दिवस इथल्या सगळ्या जातीपातीही गडप होतील. त्यांच्यातले राज्यकर्तेही गडप होतील. त्याप्रमाणे मोदी, मोदींचे राज्य, फडणवीस, फडणवीसांचे राज्यही शाश्वत नाही. ते ही संपुष्टात येईल. प्रत्येकाला अंत असतो हेच शाश्वत सत्य आहे. या शाश्वत सत्याची जाणीव ठेवून ब्राम्हण जातीतल्या विकृतांनी माणसात यावं. या विकृत जातीयवाद्यांना माणसात आणण्यासाठी चांगल्या ब्राम्हण बांधवांनी माणूसपणाची चळवळ उभी करायला हवी. उन्मादी व जातीयवादी अहंगंडात अडकलेल्या जनावरांना माणूस करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. अशी चळवळ नाही उभारली, ही जातीयवादी, उन्मादी व मस्तवाल जनावरं माणसात नाही आणली तर त्याचा फटका सर्व जातीला बसू शकतो. त्याचा त्रास इतर निष्पाप लोकांनाही होवू शकतो.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर तेच झालं. नथूराम गोडसे आणि संघाच्या हरामखोरीचा फटका अनेक निष्पाप ब्राम्हण बांधवांना बसला. त्यांचा काहीही दोष नसतानाही त्यांना लोकांच्या उद्रेकाला सामोर जावं लागलं. अनेक निष्पापांची घरं जाळण्यात आली. त्यांना गावातून हाकलून देण्यात आलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतरही शिख बांधवांच्या बाबतीत हेच झालं. त्यांनाही उद्रेकाला सामोर जावं लागलं. मुळ गुन्हेगार राहिले बाजूला पण ते अवघ्या जातीला भोगावं लागलं. केवळ जातीचे होते म्हणून अनेक निरपराध व निष्पापांच्यावर अत्याचार झाले. हे असं होतच. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातला काही ब्राम्हणवर्ग विकृत जातीयवादाच्या आहारी गेला आहे. या जातीयवादाला हिंदूत्वाचे लेबल लावून त्याच्याआड दडत तो बहूजन समाजाला खेळवतो आहे, हवे तसे वापरतो आहे. जाती-जातीत विष पेरतो आहे. बहूजनांच्या विरूध्द बहूजन समाज लढवतो आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजातल्या अनेक बांधवांना हे ब्राम्हणांचे हिंदूत्ववादी ढोंग लक्षात आले आहे. त्यांच्या जसे लक्षात आले तसे कधीतर इतरांच्याही येईल. कधी काळी पुराणकथा आणि ब्रम्हआज्ञा शिरोधार्य माणणरा समाज त्या कपोलकल्पीत थोतांडांना कोलता झालाच ना ? त्या प्रमाणे हे ही घडेल. एक दिवस या ढोंगालाही तो कोलून लावेल. पण त्यासाठी काही अघटीत घडो नये. काही अनर्थ घडो नये. समाजात फिरताना काही विकृतांच्या जातीयवादी मानसिकतेमुळे अवघ्या ब्राम्हण जातीबद्दलच टोकाचा द्वेष वाढताना दिसतो आहे. इतर जाती आणि ब्राम्हण बांधवांच्यात दरी निर्माण होताना दिसते आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात अघटीत घडण्याचा धोका वाटतो. तेव्हा ब्राम्हण जातीतल्या जाणत्या, विचारी आणि विवेकी लोकांनी पुढे यायला हवं. ब्राम्हण संघटणांनी आपल्याच लोकांच्या मनातील विकृतीला नष्ट करण्यासाठी काम करावं. या कामाकडे माणूसपणाची चळवळ म्हणून पहावं. ही चळवळ अत्यंत गरजेची व निकडीची आहे. ब्राम्हण समाजातल्या विवेकी लोकांनी यावर खरच गांभिर्याने विचार करावा. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान या ठिकाणी आठवल्याशिवाय रहात नाही. जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे ।। दुरितांचे तिमीर जावो । विश्वस्वधर्म सुर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणीजात ।।