हजारो भाविकांनी घेतले स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन

90

*सचिन सरतापे प्रतिनिधी म्हसवड मोबा.9075686100*

म्हसवड :राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत काशी विश्वेश्वरचे अवतार संबोधले जात असेल येथील श्री.सिध्दनाथ मंदिराखालील भुयारात मधील स्वयंभू शिवलिंगाचे महाशिवरात्रीच्या रात्री हजारोच्या संखेतील भाविकांनी रांगेतून दर्शन घेण्याचा लाभ यंदा सुलभतेने घेतला.
हे भुयार वर्षातून एकदाच फक्त महाशिवरात्रीस भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते.त्यानंतर पहाटे पाच वाजता पुन्हा पुर्ववत वर्षभर कुलुप बंद अवस्थेत परंपरेनुसार ठेवण्यात येते. महाशिवरात्रीस मंदीरामधील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरीच्या मुर्तीची दैनंदिन रात्रीची आरती होताच रात्री दहा वाजता हे भुयार उघडण्यात आले.
प्रथम भुयारातील साफसफाई करून परंपरागत प्रथेनुसार स्वयंभू शिवलिंगाला पंचामृत व गरम उदकाने अभ्यंग स्नान घालण्यात आले.नंतर विधीपूर्वक पंचामृताने जलाभिषेक करण्यात आला.नंतर सालकरी यांच्या हस्ते शिवलिंगास दहीभात पूजा बांधण्यात आली.व आरती झाल्यानंतर दहीभात पूजा उतरविण्यात आली.
पुन्हा गरम उदकाने स्वयंभू शिवलिंगास स्नान घालण्यांत आले. त्यानंतर बेल,फुले, आंब्याचा मोहर,चंदन, हळदी,कुंकू, गुलाल, बुक्का,भस्म, अक्षता,श्रीफळ, आदी पूजा साहित्य वाहून संकल्प सोडण्यात आला.हा सर्व धार्मिक विधी सालकरी व सालकरीण यांच्या हस्ते परंपरागत प्रथेनुसार करण्यात आला.हा धार्मिक विधी पिंटू पाठक व प्रजोत पाठक या पुरोहितांनी पुर्ण करताच हे स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
गावोवच्या भाविकांच्या रांगेतून दर्शनास प्रारंभ झाला. रात्री दहा ते पहाटे आज पहाटे पर्यंत दर्शनरांगेतून हजारो भाविकांनी या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे साडेसहा वाजता पुन्हा सालकऱ्यांच्या हस्ते शिवलिंगास स्नान घालून, संपूर्ण भुयाराची स्वच्छता करून भुयाराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.

चौकट
या वर्षी या भुयारात मंदीर ट्रस्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवून हत्ती मंडपातील टीव्हीच्या मोठ्या स्क्रिनवर भुयारातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शनाची सुविधा केली होती.

या भुयारात उतरण्यासाठी प्रारंभी चार फुटांपर्यंत पायऱ्याची सुविधा नव्हती त्यामुळे भाविकांच्या दोन्ही दंडास धरून भुयारात सोडले व दर्शनानंतर वर याच पध्दतीने घेतले जात असे.
मंदिराच्या अस्तित्वात पासून सुमारे तेराशे वर्षापासुव अशीच पद्धत सुरू होती. मात्र या वर्षी देवस्थान ट्रस्टने भुयारात उतरण्यासाठी व चढण्यासाठी पायऱ्या तयार करू घेतल्यामुळे पायी चालत खोल भुयारात उतरणे व दर्शन घेऊन पुन्हा बाहेर पडणे सोयीचे झाले.
याबरेबरच मंदीरास हत्ती शिल्पासमोर एकच मुख्य प्रवेश द्वार होते.या प्रवेशद्वारातूनच भाविकांना मंदीरात जाणे व बाहेर येणे भाग पडत असे परिणामी प्रवेशद्वारासमोर भाविकांना मोठ्या संख्येतील गर्दीचा सामना करावा लागे.
या समस्येचे निवारण करण्यासाठी येथील स्थापत्य अभियंता सद्दाम चोपदार यांनी मंदीरास आणखी एक प्रशस्त प्रवेश द्वार बांधकामासह मंदीराखालील भुयारात भाविकांना पायी चालत उतरणे व पुन्हा बाहेर येण्यास पाय-यांचे बांधकाम करुन भाविकांना जलद गतीने दर्शनाच्या लाभाची सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकात समाधान व्यक्त करण्यात आले.