शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमतेसाठी घरोघरी मोत्याची शेती होणे गरजेचे- डॉ. अजय घ. पिसे

112

🔸मोत्याची शेती विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11मार्च):-अनेक दशकांपासून शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. पारंपारिक शेती करीत असल्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसे उत्पन्न, हमीभाव मिळत नाही. बहुतांश शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आता शेतकर्यांनी हमखास उत्पन्नासाठी आधुनिक शेतीकडे वळावे लागेल, शिम्पल्यांपासून मोत्याची शेती हि अतिशय कमी खर्चात व हमखास उत्पन्न देणारी असून शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमतेसाठी घरोघरी मोत्याची शेती होणे गरजेचे असे प्रतिपादन डॉ. अजय घ. पिसे यांनी घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्र, सातारा (कोलारा गेट, चिमूर) येथे आयोजित “मोत्याची शेती” या एक दिवसीय कार्यशाळेत केले. शेतकरी व होतकरू युवक-युवतींनी आधुनिक शेतीचे नवनवीन प्रयोग करून आर्थिक उत्पन्न कशे वाढविता येईल यावर भर द्यावा असे मार्गदर्शन सातारा ग्रामपंचायत चे सरपंच श्री गजानन गुडधे यांनी केले.

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आग्या पर्ल्स व एक्स्पोर्ट, नागपूर च्या मुख्य संचालक गायत्री तीवास्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व प्रत्याक्षित करून दाखविले. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या अनेक इच्छुक व उत्साही युवक, विद्यार्थी, शेतकरी, व महिला यांनी उपस्थिती दाखविली. प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान सर्वांनी ‘मोत्याची शेती’ करण्यामध्ये असलेल्या सर्व लहान-सहान बारकाव्यांवर चांगली चर्चा घडवून आणली.

यादरम्यान अनेकांनी आपण मोत्याची शेती चालू करणार असल्याचा निर्णय घेतला. काही अनुभवी लोकांनी ‘मोत्याची शेती’ चे क्लस्टर बनविण्यात यावे जेणेकरून स्किल विकसित करून रोजगार निर्मिती होऊ शकते अश्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल इंदोरकर व आभारप्रदर्शन विलास दिघोरे यांनी केले. या एकदिवसीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी माणिक पिसे, संजय मेश्राम, लीलेश्वर कोसे, ओंकार कोवे, संदीप वैद्य, दिलीप कुंभरे, रोशनी कुंभरे, मोतीरामजी कोडापे, विजय कोडापे यांनी अथक परिश्रम केले.