पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” पुस्तकाचे नायगाव येथील पहिल्या महिला अधिवेशनात प्रकाशन !…

230

🔸ज्ञानज्योती सावित्रीमाईंच्या जन्मभूमीत माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले माझ्या जीवनातला हा अविस्मरणीय क्षण !… पी डी पाटील

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी पाटील)

धरणगांव(दि.11मार्च):-नुकतेच सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगाव, तालुका खंडाळा येथे उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज महिला संघाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई वनकर होत्या. प्रमुख वक्त्या स्मिताताई पानसरे, अँड.वैशालीताई डोळस, सुजाताताई गुरव, दर्शनाताई पवार, अँड.वासंती नलावडे, झेबूनिस्सा शेख उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन वैशालीताई पतंगे, स्वातीताई कोरी, मंजिरीताई धाडगे, कॉ.आनंदी अवघडे, डॉ. कुंदाताई धुळे, मीनाक्षीताई राजेंद्र कुंभार, जयश्रीताई लोंढे, विशेष निमंत्रित महिलांमध्ये निताताई नेवसे, सविताताई फाळके, सुनंदाताई जाधव, संगीताताई सूर्यवंशी, गायत्रीताई इरले, लताताई खाडे, सुनिताताई माळी, वैष्णवीताई राऊत, संगीताताई वसमाने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नायगांव येथील सत्यशोधक समाज संघाच्या पहिल्या महिला अधिवेशनात वैशालीताई पतंगे ( अति.आयुक्त वस्तु व सेवाकर पुणे ), वंदनाताई वनकर ( अध्यक्षा – सत्यशोधक समाज महिला संघ ) व विचार मंचावरील माता-भगिनींच्या हस्ते पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या ऐतिहासिक सावित्रीमाईंच्या जन्मभूमीत माझ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे.

यातून मी नक्कीच प्रेरणा घेऊन, अधिक ऊर्जा घेऊन भविष्यात लेखन करणार असे प्रतिपादन पी डी पाटील यांनी केले. सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य यांनी मला संधी दिली म्हणून हे मी पहिले पुस्तक निर्माण करू शकलो व अध्यक्ष अरविंद खैरनार यांचे मला सतत मार्गदर्शन लाभले. मी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य संपूर्ण टीम च्या ऋणात राहू इच्छितो. पाटील यांचे मित्र परिवाराकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.