स्वा.विर सावरकर यांच्या चित्रपटातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखवलेला भाग वगळण्यात यावा.!

129

🔸भीम आर्मी ची मागणी.!

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11मार्च):-स्वा.वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित येणाऱ्या चित्रपटामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाग दाखवलेला आहे.त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा रोल एका विद्रूप अभिनेत्याद्वारे करण्यात आला आहे.परंतु या देशात अतिशय देखणे अभिनेते असताना देखील हेतुपुरस्पर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना व्हावी ह्या दृष्टीने एका विद्रूप अभिनेत्याला त्यांचा रोल करायला लावला ते अतिशय दुःखत आहे,त्यामुळे संविधान प्रेमी क आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भीम आर्मी चा या चित्रपटाला विरोध नसून त्या चित्रपटातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दाखवलेला भाग वगळवण्यात यावा.यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

अन्यथा महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.सविंधान प्रेमीच्या भावना लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी , अशी मागणी भीम आर्मी यवतमाळ युनिट कडून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळेस भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, तालुका उपाध्यक्ष अजय लोखंडे, धनराज कांबळे, करण खंदारे, वैभव सूर्यवंशी, संतोष लांडगे , संविधान प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.