प्रा. डॉ.रवींद्र.विखार सन्मानित

128

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.11मार्च):- श्री संताजी प्राध्यापक स्नेही मंडळ चंद्रपूर व गडचिरोली द्वारा आयोजित सत्कार समारंभात प्रा. डॉ. रवींद्र विठोबा विखार यांना सन्मानित करण्यात आले.

चंद्रपूर येथील एनडीए हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध विधीतज्ञ एडवोकेट विजयराव मोगरे हे होते तर विशेष अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर, गोंडवाना विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, माजी आमदार देवराव भांडेकर, रघुनाथ शेंडे ,वैज्ञानिक प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे, प्रा. डॉ. नामदेवराव वरभे, रातुम विद्यापीठाचे रा से यो समन्वयक डॉ. सोपानदेव पिसे, शोभाताई पोटदुखे, सतीशजी चापले ,सुधाताई पोटदुखे ,प्रकाशजी देवतळे, डॉ. नामदेवराव हटवार इत्यादी उपस्थित होते.

प्रा.डॉ.रवींद्र विठोबा विखार यांच्या शैक्षणिक ,सामाजिक कार्याची दखल घेऊन येथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. रवींद्र विखार हे कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथील इयत्ता अकरावी व बारावी समाजशास्त्र विषयाचे ते सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे . विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे ते सचिव असून विदर्भ तेरी महासंघ शाखा ब्रह्मपुरी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सात पुस्तके प्रकाशित असून गोंडवाना विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून तर बीए अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून समाविष्ट झालेले आहेत. बालभारती द्वारा इयत्ता पाचवी व तिसरीच्या भूगोल संपादन मंडळात त्यांनी कार्य केलेले असून अनेक वृत्तपत्रात त्यांची लेख प्रकाशित झालेली आहेत. पन्नासाहून अधिक संशोधन पेपर राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेली आहेत .

अभ्यासू ,निगर्वी, निर्व्यसनी ,विनयशील अस व्यक्तिमत्व असून सर्वांना सहकार्य ,मदत करणारे, म्हणून ते सर्वत्र सुपरीचीत आहेत .त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, चंद्रपूरजिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,ब्रह्मपुरी भूषण, समाजभूषण असे अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.