लक्ष्मण मेश्राम,ज्ञानेश्वरी कापगते, हिरालाल पेंटर, अनिल नाकडे यांचा नाट्य मंडळातर्फे सत्कार

100

🔸जय राधेश्याम बाबा आदर्श नाट्य कला मंडळाचा स्तुत्य उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12मार्च):-तालुक्यातील खरकाडा येथे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर कलादर्पण नाट्य रंगभूमी वडसा द्वारे टिळा कुंकवाचा या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले होते .या नाटकाचे उद्घाटक डॉ जी.एम. बालपांडे हे होते तर अध्यक्ष म्हणून प्रा.अतुल देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी उपाध्यक्ष म्हणून वंदनाताई शेंडे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर जी भोयर, मुखरुजी पारधी.अंबर जी ठाकरे ,यशवंत आंबेरकर नानाजी तुपट हे होते . त्यानंतर नेवाजाबाई हितकरिनि विद्यालय येथे शिक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल श्री लक्ष्मण मेश्राम यांचा नाट्य मंडळा सत्कार करण्यात आला.

सदर सत्कार हा माझा नसून माझ्यासाठी मोलाचे सहकार्य ,मार्गदर्शन करणाऱ्या आई वडिलांचा आहे असे सांगून सदर सत्कार लक्ष्मण मेश्राम यांनी आपल्या वडिलांना अर्पण केला .त्यानंतर झाडीपट्टीरंगभूमी वरील अनेक वर्षापासून नाट्यक्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या हिरालाल पेंटर,ज्ञानेश्वरी कपागते ,अनिल नाकतोडे यांचा सुद्धा जय राधेश्याम बाबा आदर्श नाट्य कला मंडळाद्वारे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मेश्राम यांनी केले प्रास्ताविक आनंद शिउरकर तर आभार ताराचंद पारधी यांनी केलेसदर कार्यक्रमाला बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.