उद्योजक क्षेत्रातील कर्तृत्वान दिव्यांगाचा सत्कार आत्मसन्मान मिळवायचा असेल तर आत्मनिर्भर होणे गरजेचे- संगीता तुमडे

163

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड:- प्रहार दिव्यांगमंच तळोधी (बॉ) व परिसर संघटना, संघर्ष दिव्यांग सेवा जणपरिसर संघटना मिंडाळा आणि संकल्प दिव्यांग जनपरिसर संघटना गांगलवाडी यांच्या संयुक्त सहभागाणे दिनांक १४ मार्च २०२४ ला हनुमान देवस्थान गायमुख इथे दिव्यांगाचा सामुहिक स्नेहमीलन सोहळ्यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन उद्योजक दिव्यांगाचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
दिव्यांग व्यक्तींनी आत्मसन्मान मिळवायचा असेल तर आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.दिव्यांग व्यक्तींनी न्युनग्नड न बाळगता व्यवसाय करुन स्वालंबी बनावे.असे प्रतिपादन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेड्याच्या टीम व प्रकल्प समन्वयक संगीताताई तुमडे यांनी केले.
दिव्यांगव्यक्तींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनिविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी आमचा सर्वोतोपरी सहभाग असेल, कामात सतत सोबत असेल. यावेळी त्या कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणुन दिव्यांग्यासोबत संवाद साधीत बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून झाली. तर प्रमुख अतिथी म्हणुन विदर्भ विकलांग संघटनेचे अध्यक्ष यशवंतकाका पाटणकर यांनी संघटना बनविण्याचा उद्देश व संघटनेच्या कामाची माहिती आपल्या मार्गदर्शनपर भाषनातून मांडली , वि. वि. सं. सदस्य वंदनाताई प्रधान आदीची उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून स्वतःचा व्यवसाय थाटणाऱ्या दिव्यांग उद्योजग महिला सुनिताताई म्हस्के तळोधी, आणि दिव्यांग व्यक्ती भिमरावं लिंगायत नवेगाव (हुं ) यांचा संगीताताई तुमडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. रेविति बगमारे बऱ्हडकिन्ही यांना यशवंत पाटणकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी दिव्यांग बांधव दयालसिंग जुनी, प्रणय बांगरे, षडानन देशमुख, अरुण शेडे, फाल्गुण भोयर, सुनीता म्हस्के, पांडुरंग कावळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रहार दिव्यांगमंच चे अध्यक्ष व पत्रकार तुलोपचंद गेडाम यांनी पार पाडले.या सोहळ्यात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवाची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.
.कार्यक्रमाच्या यश्वितेकारिता नितेश नागापुरे तालुका समन्वयक, अनिता बावणकर स्वयंसेविका,उपेंद्र बोरुले स्वयंसेवक, संतोष वाढोणकर, विकास लांजेवार, हेमंत वाकडे,पांडुरंग येरणे, श्रावण गेडाम, हिरामण ठाकरे, साहिलदास आत्राम, रुपेश मरहसकोले, देविदास कन्हाके, मधुकर बोरकुटे, प्रल्हाद मेश्राम, जीवन गुरनुले, आशिष लिंगायत आदींचे सहकार्य लाभले,