बोरी (खु)मंडळात अवकाळी पावसामुळे झाले पिकांचे नुकसान

97

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद: पुसद तालुक्यातील बोरी (खु)मंडळात दिनांक १७ मार्च २०२४ रविवार रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बोरी (खुर्द) मंडळासहित बोरी (मच्छिंद्र), बोरगडी, मांडवा, सांडवा, काकडदाती, कोपरा, वडसद, कारला, धनसळ, मनसळ अशा इतर गावात रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

काढणीला आलेला गहू हा जमीनदोस्त झाला आहे तर ज्वारी हे पीक सुद्धा आडवे झाले आहे. तसेच भुईमूग, भाजीपाला काही प्रमाणात हरभरा अशा विविध पिकाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तसेच आणखीन तीन चार दिवस अवकाळी पाऊस राहील असा हवामान अंदाज वर्तविन्यात आलेला आहे .

तरी शासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.