मानव विकास योजनेअंतर्गत 425 विद्यार्थिनींना सायकल वाटप

345

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

 

ब्रम्हपुरी:- नेवजाबाई हितकारिनी कन्या विद्यालय, ब्रम्हपुरी येथे मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नेवजाबाई भैय्या हितकारिनी शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय अशोकजी भैय्या साहेब, पंचायत समिती ब्रह्मपुरीचे गटशिक्षण अधिकारी सन्माननीय खांडरे साहेब, विस्तार अधिकारी सन्माननीय श्री. खुणे साहेब, पंचायत समितीचे समन्वयक सन्मा.श्री चहांदे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बनपुरकर मॅडम, पर्यवेक्षक श्री. निखारे सर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकजी भैय्या साहेब यांनी विद्यार्थिनींना राज्य शासनाकडून होणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यायला सांगून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच गटशिक्षणाधिकारी सन्मा.श्री खांडरे साहेब ,विस्तार अधिकारी सन्मा.श्री. खुणे साहेब यांनी सुद्धा विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर योजेअंतर्गत विद्यालयातील एकूण 425 मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. निखारे सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौ.उंदीरवाडे मॅडम,आभार प्रदर्शन सौ नगराळे मॅडम यांनी केले.