स्टाईल फरसी बसविणाऱ्या कारागीराने स्मारकाचे निशुल्क काम करण्याचा केला संकल्प

63

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

 

पुसद: तालुक्यातील मांडवा येथे लोकसहभागातून लोकशाहिर, साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाचे कार्य युध्द पातळीवर सुरु आहे. यासाठी असंख्य देणगीदात्यांनी श्रम, पैसा, वेळ,नवस्तूरुपी मदत करून सहकार्य केले. या कार्यासाठी स्टाईल फरसी बसविणाऱ्या कारागीराने निशुल्क स्टाईल फरसी बसवून देण्याचा संकल्प केला.

दिग्रस येथील स्टाईल फरसी बसविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नामदेव गरडे या कारागिराने समाजाला आपल्याला काहीतरी देणे लागते. या सामाजिक उदात हेतूने मांडवा येथील स्मारकाच्या कामासाठी स्टाईल फरसी बसविण्याच्या कामाची मजुरी २५ हजार रुपये होते. परंतु त्या कामाचा एकही रुपया न घेता काम करून देण्याचा केला संकल्प यावेळी मांडवा येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी ठेकेदार ,कारागीर नामदेव गरडे, डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष देविदास गजभार, ग्राम परिवर्तन समितीचे उपाध्यक्ष बजरंग राठोड, नितीन आडे, अर्जुन आडे, किर्तीराज आडे,नागेश लांडगे,शैलेश जाधव तसेच ईत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.