बोधिसत्व बुद्धविहाराच्या पुढील बांधकामास सढ्ळ हाताने दान करा

78

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

यवतमाळ :दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने बोधिसत्व बुद्धविहार बांधकाम समितीच्या अंतर्गत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यवतमाळच्या बायपास रोडवर पिंपळगाव येथे भव्य अशा बुद्धविहाराची निर्मीती होत आहे.

या बुद्धविहाराच्या निर्मीतीला अनेक वर्षा पासुन असंख्य दानदात्यांनी अगदी मनापासून भरभरून सहकार्य केले आहे त्यामुळे आतापर्यंत ८०टक्के काम पुर्ण झाले असुन आता फक्त आणि फक्त २०टक्के बांधकाम शिल्लक आहे. सध्याच्या परिस्थिती मध्ये बांधकाम मटेरियल चे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तरीही हे बांधकाम पुर्ण करण्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्नशील आहोत ज्या देणगी दात्यांनी आतापर्यंत दान दिले आहे ते सर्व दानदाते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. पण ज्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची देणगी दिली नाही त्यांचे पर्यंत आम्ही आतापर्यंत पोहचलो नाही याबद्दल आम्ही दिलगिरी वेक्त करतो. तसेच ज्यांनी ज्यांनी देणगी देऊन सहकार्य केले आहे त्यांनी पुन्हा पुन्हा देणगी देऊन बोधिसत्व बुद्धविहाराच्या पुढील बांधकामासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे नव्हे ती काळाची गरज आहे.

सद्या बोधिसत्व बुद्धविहाराच्या समोरच्या भागाचे छपाईचे बांधकाम प्रगतिपथावर असून या बांधकामासाठी प्रमोद टेंभूर्णे यवतमाळ या बांधकाम ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. देणगी दात्यांनी स्व:त प्रत्यक्ष भेट देऊन बोधिसत्व बुद्धविहाराच्या पुढील बांधकामाची पहाणी करावी आणि देणगी देऊन सहकार्य करावे असे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर व बोधिसत्व बुद्धविहार निर्मिती अध्यक्ष रविजी भगत संपर्क 97675 92448 तथा संपूर्ण समिती यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.