शेतकरी आठ महिण्यापासून वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

13

🔸निर्दयी सरकार शेतकऱ्यांची कीव घेणार का? – मधुकर मानकर यांचा प्रश्न

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.4ऑगस्ट):-मागील वर्षीच्या हंगामात वन्य प्राणी यांचेकडून शेत पिकाचे नुकसान झाले ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अर्ज सादर केले त्यावर वन विभागाच्या मार्फत पंचनामे करण्यात आले मागील वर्षी डिसेंबर महिन्यांत पिकांचे पंचनामे करून सुद्धा आता आठ महिन्याचा काळ होऊन अजून पर्यंत मोबदला मिळाला नाही.

वन परिक्षेत्र अधिकारी चिमूर अंतर्गत येत असलेल्या भिसी वन विभाग कार्यलय अंतर्गत येणाऱ्या आंबोली, गडपीपरी, लावारी, चिचाळा(शास्त्री) या गावातील अनेक शेतकरी मागील आठ महिन्यापासुन नुकसानभरपाई च्या प्रतीक्षेत आहेत देशात कोरोनाच्या संकटामुळे आर्थीक टंचाई आहे शेतकरी लोकांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठया प्रमाणात पैशाची आवश्यकता आहे.त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर नुकसानभरपाई मोबदला देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत:-

मागील वर्षीच्या हंगामात धान, व पाऊस या पिकांचे वन्य प्राण्यांमुळे खुप मोठे नुकसान झाले आठ महिने होऊन सुद्धा अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही या आधीच्या भाजपा सरकारमध्ये एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई मिळत होती परंतु आता असलेल्या निर्दयी महाविकास आघाडी सरकाच्या काळात विलंब होत आहे.या निर्दयी सरकार ला शेतकऱ्यांची कीव येणार का?असा प्रश्न आहे.