“आमचे आदर्श, आमची प्रेरणा” पुस्तक बहुजन समाजास दिशादर्शक : मुनीवर शिकलगार

139

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : अखिल महाराष्ट्र शिकलगार सेवा संघटनेच्या वार्षिक अधिवेशनामध्ये सामाजिक कार्यकर्ते मुनीवर शिकलगार लिखीत ” आमचे आदर्श,आमची प्रेरणा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी गणी शिकलगार,सलीम शिकलगार,हलीमाआप्पा शिकलगार, चंदुलाल सर शिकलगार, अभियंता शबाना शिकलगार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष नौशादभाई शिकलगार म्हणाले की, सदर पुस्तकात बहुजन समाजाला ज्या महामानवांनी विचार,कार्य व साहित्याने योग्य दिशा मिळाली त्यांच्यावर आपल्यातील युवकाने जे साहित्य निर्माण केले आहे.ते कौतुकास्पद आहे.अशीच राष्ट्रीय एकात्मता व एकता घडवण्याचे कार्य सतत झाले पाहिजे.तरच समाजात एकोपा नांदेल असा आशावाद व्यक्त केला.या पुस्तकाचा प्रचार, प्रसार जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला हवा.तसेच या वार्षिक अधिवेशनामध्ये सलग२८वेळा रक्तदान करण्याची कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अय्याज शिकलगार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष याकुब शिकलगार यांनी केले.या कार्यक्रमात इंडीयन युथ फौंडेशनचे अॅड.अमीर‌ मणेर,अॅड.सिकंदर शिकलगार,आयुब शिकलगार, नौशाद शिकलगार आदि युवा कार्यकर उपस्थित होते.