स्वर्गीय सुधाकर पाईकराव यांच्या प्रित्यार्थ सम्यक बुद्ध विहाराला चपाती तावा भेट

  242

   

  ✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

  उमरखेड (दि. 19 एप्रिल) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहराला स्वर्गीय सुधाकर पाईकराव यांच्या प्रित्यार्थ उपासक उमेश सुधाकर पाईकराव यांच्या कडून सम्यक बुद्ध विहाराला चपाती तावा सप्रेम भेट देण्यात आला.

  व तो रमामाता महिला मंडळ यांनी स्विकार करून उमेश पाईकराव व त्यांची पत्नी सौ. प्रेरणा पाईकराव यांचा रमामाचा महिला मंडळ अध्यक्ष उषाताई इंगोले यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छा व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

  यावेळी रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई इंगोले, भारतीताई केंद्रेकर उपाध्यक्षा, सुनिता दिवेकर कोषाध्यक्ष, कांचन दिवेकर, उज्वला धबाले, राखी धबाले सचिव, स्वाती दिवेकर संघटक, विद्या इंगोले, मिराबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, शारदा बहादुरे, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, तुषार पाईकराव, दिपक इंगोले इत्यादी अनेक उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.