मतदाना पूर्वी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सीलबंद करण्याचे काम आज पूर्ण

101

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 19 एप्रिल) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गंत 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय डॉ. सखाराम मुळे व तहसीलदार आर. यु. सुरडकर, सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या देखरेखीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत व व्हीव्हीपॅट सीलबंद करण्याचे काम सुरू होते. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सीलबंद करण्याचे काम आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी पूर्ण झाले आहे. या कामाकडे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांनी लक्ष घातले असून, उमरखेड तहसीलदार आर यु सुरडकर महागाव तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, सर्व उमरखेड व महागाव नायब तहसीलदार, मंडल अधिकारी संजय वाघमारे या सर्वांनी काळजी पूर्वक लक्ष देऊन संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण पार पडली आहे.