कोरोनावर मात करून मरखेल पोलिस ठाण्याचे कार्यरत पोलिस सपोनि आधित्य लोणीकर जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यावर रुज होणार

12

✒️माधव शिंदे (नांदेड ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.4 ऑगस्ट):-देगलूरकर तालुक्यातील मरखेल पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी सुरुवातीपासून कोरोना लकडाऊन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत आहेत,आपले कर्तव्य म्हणून सपोनि आधित्य लोणीकर यांनी वाडी ,तांडा ,खेडोपाडी जनतेच्या सेवेत कर्तव्य बजावत असताना, ताप आल्याने बरे वाटत नसल्याने कदाचित आपणास कोरोनाची लागण झाली आसेल का…? या शंकेमुळे स्वँब तपासणी साठी पाठवले असता त्यांना दि.21 जुलैला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवाला पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचा व कुटुंबातील सदस्यांची चाचणी केली असता त्यांच्या चार वर्षाच्या मुलींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यानंतर त्यांच्यावर देगलूर व नांदेड येथे उपचार करण्यात आले.दहा बारा दिवस दवाखान्यात राहिल्याने यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. असून ते आता जनतेच्या सेवेत पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
————————————–
नागरिकांनी कोरोना महामारीला घाबरु नये,त्यावर यशस्वीपणे मात करता येते.देगलूरसह,नांदेड येथील शासकीय रुग्णालयात चांगला उपचार केला जात असल्याचा मी अनुभवघेतला आहे.आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देण्यात यावा.व जनतेने घरात राहावे, विनाकारण घरा बाहेर पडूनये, वेळोवेळी सेनिटाइझर व मास्क चा वापर करावे,घरातच सुरक्षित राहावे.
*अदित्य लोणीकर*
*सह्याक पोलिस निरीक्षक*
*मरखेल पोलिस स्टेशन*