सेलिब्रेशन लॉनच्या डिजे सांऊड सिस्टीम व उरलेल्या अन्नाच्या घान वासेने नागरिक त्रस्त नगर वासीयानी घेतली वरिष्ठाकडे धाव : उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन

554

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- नागेश्वर नगर, मालडोगरी रोड ब्रम्हपुरी येथे एन.एस. (राऊत) सिलिब्रेशन लॉन नावाने नविन लॉन ओपन झालेला आहे. त्या लॉनमध्ये बरेच कार्यक्रम झालेले आहे व भविष्यात होणार आहेत त्या कार्यक्रम प्रसंगी सांऊड सिस्टीम लावले जात आहेत. लॉनच्या अगदी सभोवताल लागून वॉर्डातील घरे आहेत. त्यामुळे डिजे सांऊड सिस्टीमच्या अति आवाजामुळे घरांची दारे खिडक्या मोठ्या प्रमाणात व्हायब्रेट होत असतात तसेच अंती आवाजामुळे लहान मुलांच्या व वयस्क लोकांच्या हद्‌द्यावर व विद्यार्थीवर्गावर गंभीर परीणान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत नागेश्वर नगर वाशीयांकडून लॉन मालकाला बरेच वेळा कळविण्यात आलेले आहे. व चर्चासुध्दा झालेली आहे पण चर्चेअंती डिजे सांऊड सिस्टीमचे कार्यक्रम घेतले जाणार नाही असे आश्वासन दिलेले होते. परंतु अजुनही डिजे सांऊड सिस्टीम कार्यक्रम प्रसंगी मोठया आवाजात लावले जात आहेत. दि. 24/04/2024 ला लॉन मालकाला लेखी निवेदन दयायला गेले असता त्यांनी लेखो निवेदन घेण्यास तयार नाही. त्यामुळे नागेश्वर नगर वासीयांची शांतता भंग झालेली आहे .करीता नागेश्वर नगर वासीयांची सदर लॉनमध्ये कार्यक्रम प्रसंगी डिजे सांऊड सिस्टीम वाजविण्यास प्रतिबंदी घालावी.
तसेच कार्यक्रम प्रसंगी उरलेले टाकावू अन्न, पाणी व डिस्पोझलची सुध्दा योग्य प्रकारे विल्लेवाट न लावता सरसकट समोरच्या नालीमध्ये टाकले जात आहे .त्या अन्नाची नालीमध्ये सडण्याची प्रकीया होवुन आजुबाजुच्या परीसरात खुप घान वास येत आहे. त्याचा नगर वासीयांना खुप त्रास होत आहे. ही बाब सुध्दा आरोग्यासाठी हानीकारक आहे व तसीच परीस्थिती पुढे राहील्यास नागेश्वर नगर मध्ये राहण्यास खूप कठीन होईल. तरी उरलेले टाकावू अन्न, पाणी व डिस्पोझलची सुध्दा योग्य प्रकारे विल्लेवाट लावण्याकरीता लॉन मालकाला सुचित करावे जेनेकरुन नागेश्वर नगर वासीयांना डिजे सांऊड सिस्टीमचा व घान वासेचा त्रास होणार नाही. याकरिता अर्शिया जुही मुख्याधिकारी नगर परिषद ब्रम्हपुरी, उपविभागीय अधिकारी, तहसीदार तहसील कार्यालय ब्रमपुरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन सादर करतांना किशोर प्रधान, गजानन राऊत, चंद्रकांत सुर्यवंशी, विलास फुलझेले, धनजंय पोटे, सौ.नंदा अविनाश हाडगुडे, रिताताई योगेश मांढरे, सौ. शारदा माधव प्रधान, सौ. विद्या रविद्र ठाकरे, शाशिताई प्रधान, अल्काताई राउत, सौ. तुलना पोटे डा. पुरी साहेब, अमर दोनाडकर, विलास भागडकर, रमेश बुराडे, हरीचंद रंदये मंजूषा फाये, सौ. अनुसया प्रभुजी ढोंगे, व अन्य वार्ड वासिय उपस्थित होते.