शुभमंगल आटोपून थेट नवरदेव मतदान केंद्रावर-लहू चव्हाण नवविवाहित तरुणाने बजावला मतदानाचा अधिकार

218

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद प्रतिनिधी:संपूर्ण भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे . आज दिनांक २६एप्रिल २०२४ रोजी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सायंकाळी संपले

लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान यवतमाळ-वाशीम लोकसभा ८१ पुसद विधानसभा मतदारसंघातील मतदान बूथ क्रमांक २८० प्रार्थमिक मराठी शाळा मांडवा येथील निवासी तरुण युवक लहू चव्हाण यांनी आज आपला
लग्न सोहळा झाल्याबरोबर
मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले व लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपल्या मतदानाचा अधिकार बजावीत निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.
त्यांच्या लग्न सोहळा व मतदान प्रक्रियेत भाग घेण्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक व रहिवासी नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.