प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांचे निवारण न झाल्यास महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

110

@केन्द्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे पदोन्नतीचे तात्काळ भरा…..
@ आदिवासी एकस्तर वेतन निश्चिती पडताळणी साठी सेवापुस्तक जिल्हा परिषद पाठवा
रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर -जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे समस्या प्रलंबित असून प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आलेली आहेत पण अजूनही बऱ्याच समस्या प्रलंबित आहेत. केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदोन्नती ची पदे रिक्त आहेत ती तात्काळ भरण्यात यावी, आदिवासी एकस्तर वेतन श्रेणी वेतन निश्चिती पडताळणी साठी मुळ सेवापुस्तक जिल्हा परिषद लेखा विभागात पाठविण्यात यावे, वरिष्ठ वेतनश्रेणी चे आदेश निर्गमित करण्यात यावे, शैक्षणीक अर्हता मंजुरीचे आदेश निर्गमित करण्यात यावे, व मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान करावे, अतिरिक्त प्रभार असलेल्या शिक्षकांना विशेष वेतन देण्यात यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तात्काळ मंजूर करण्यात यावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले त्यांचे आदेश निर्गमित करण्यात यावे, मासिक वेतनास होत असलेल्या विलंबास जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणे, विषय शिक्षकाना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे, संयुक्त शाळा अनुदान सत्राच्या प्रारंभी व दिवाळीनंतर असे दोनच टप्प्यात देणेत यावे, स्थायी आदेश त्वरित देणे, नवीन नाव धारण मंजुरी आदेश देण्यात यावे यांसह अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून समस्या निकाली न निघाल्यास दिनांक 6 जून 2024 पासून संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.