*सासरच्या छळाला कंटाळून आईची मुलींसह आत्महत्या

14

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

🔺कुसडगाव येथील घटना

🔺पती , सासू , सासऱ्यांविरोधात जामखेड ला गुन्हा

श्रीगोंदा(दि.4ऑगस्ट):- तिन्ही मुली झाल्याने सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून कुसडगाव तालुका जामखेड येथे महिला व तिच्या तीन मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली अशी फिर्याद फिर्याद मयत महिलेच्या आईने जामखेड पोलिसात दिली याप्रकरणी महिलेचा पती सासू सासरे यांचे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

    कुसडगाव येथील शेतातील विहिरीत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास स्वाती कार्ले मुलगी अंजली,सायली ,कोमल यांचा मृतदेह आढळून आ ला होता रात्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र माहेरच्या मंडळींनी आम्ही आल्याशिवाय शेव विच्छेदन करू नये असे म्हटले होते .त्यामुळे सोमवारी शवविच्छेदन करण्यात आले सोमवारी मयत स्वाती कार्ले यांची आई शोभा वाल्मीक वाघ (रा. बाळ गव्हाण तालुका जामखेड हल्ली राहणार अहमदाबाद गुजरात) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली स्वाती हिचे कुसडगाव येथील राम दिनकर कार्ले यांच्यासोबत 2007 सालि लग्न झाले होते तिला तीन मुली होत्या तिसरी मुलगी झाल्यापासून तिचा पति राम दिनकर कार्ले ,सासरे दिनकर पर्वती कार्ले ,सासू शिलावती दिनकर कार्ले हे तिला वेळोवेळी उपाशी ठेवत होते मुलगाच हवा म्हणून तिचा मासिक व शारीरिक छळ करत होते 23 जुलैला एका विवाह प्रसंगी स्वाती हिने तिचा भाऊ उमेश ,चुलत भाऊ जोगेश यांना पती सासू सासरे खूप त्रास देत आहेत मुलींचा राग राग करीत आहेत आता सहन करण्यापलीकडे गेले असे तिने सांगितले होते असे फिर्यादीत म्हटले आहे