

आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.5ऑगस्ट):-नुकत्याच घोषित झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या निकाला मध्ये बीड जिल्ह्यातील मंदार पत्की, वैभव वाघमारे व डॉ प्रसन्न लोध या तीन तरुणांनी यश संपादन केल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले. ना.मुंडे यांनी तिन्ही भावी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तसेच ट्विटर द्वारे तिघांचे हे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण यूपीएससी ला गवसणी घालत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे तसेच आपल्याला मिळणाऱ्या पदाचा वापर करून देश हितार्थ योगदान देण्यासाठी तिघांनाही शुभेच्छा दिले आहेत.सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बीड येथील मंदार देशात 22. डॉ प्रसन्न लोध 524 तर अंबाजोगाई येथील वैभव वाघमारे 771 रँक प्राप्त करुन यशस्वी झाले आहेत.




