✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विभागाने पॉलिटेक्निक अभ्याक्रमाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून लॅपटॉप आणि मोबाईलवर www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणे शक्य होणार आहे.

गोंडपिपरी(दि.10ऑगस्ट):-राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने सोमवारपासून (ता. १०) पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना २५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विभागात ५० महाविद्यालयांत १३ हजार १२६ जागांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ६ हजार ४९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने निम्म्या जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी दहावी आणि बारावीच्या निकालात बरीच वाढ झाल्याने रिक्त जागांची संख्या घटण्याचे चिन्ह आहेत.

विद्यार्थ्यांना कागदपत्रे डाउनलोड करावी लागणार:-

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विभागाने पॉलिटेक्निक अभ्याक्रमाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून लॅपटॉप आणि मोबाईलवर www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणे शक्य होणार आहे. यानुसार विद्यार्थ्यांना कागदपत्रे डाउनलोड करावी लागणार आहेत. यानंतर विभागाकडून विद्यार्थ्यांचे ई-स्क्रुटनीच्या माध्यमातून अर्ज आणि कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी करण्यात येईल. शुल्क भरण्यासाठी क्रेडिट व डेबिट कार्ड
ज्यांच्याकडे मोबाईल वा लॅपटॉप नाही, त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने विशिष्ट वेळेत बोलावून त्यांचा कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. यासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येईल. याशिवाय प्राथमिक गुणवत्ता यादीत असलेल्या त्रुटीबाबत नियोजित वेळेत दुरुस्ती करता येईल. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वत: ऑनलाइन माध्यमातून करू शकतील. याशिवाय औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, सरफेस कोटिंग या अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देण्यात येणार आहे.

२८ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनसह बारावीनंतर औषधीनिर्माण प्रमाणपत्र, हॉटेल व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १० ते २५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्यासह विद्याथ्र्यांना १५ ते २५ पर्यंत कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. २८ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यानंतर २९ ते ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप घेता येणार आहे. २ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

असे आहे संकेतस्थळ:-

दहावीनंतर पदविका अभ्याक्रमासाठी – http://poly20.dtemaharashtra.org
थेट द्वितीय वर्षीय पदविका – http://dsd20.dtemaharashtra.org
http://posthscdiploma2020.dtemaharashtra.gov.in

 

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, शैक्षणिक

©️ALL RIGHT RESERVED