पंचायत समिती करवीर येथे सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण

38

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.15ऑगस्ट):-पंचायत समिती करवीर येते सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र हा दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर करवीर पंचायत समितीवर देखील खास खबरदारी घेतली गेली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर, परंपरेनुसार करवीर पंचायत सभापती यांनी सर्वांना संबोधित केले. सभापती धोत्रे यांनी आज दुसऱ्यांदा पंचायत समितीवर ध्वजारोहण केले, यानंतर त्या देशाला भाषणातून अनेक महत्वाच्या दिशा व जगासमोर भारताची भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या कोरोना च्या संकटाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एखाद्या योध्या प्रमाणे सामोरे जाणाऱ्या डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, पत्रकार, रुग्णालय कर्मचारी यांच्या कामाचा उल्लेख त्यांनी केला. तसेच या युद्धात देखील भारत विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर देशातील सर्व जनतेसह जगाचे कोरोना रोगावरील लसीवर लक्ष लागले आहे ती लस ही लवकरात लवकर मिळून हे संकट दूर व्हावी अशी इच्छा व्यक्त करत आपण यशप्राप्ती च्या उंबरठ्यावर आहोत असे त्या म्हणाल्या.
यावेळी करवीर पं.स. सदस्य विजय भोसले, शोभा राजमाने, मोहन पाटील, इंद्रजीत पाटील, कृष्णा धोत्रे, गटविकास अधिकारी सचिन घाटगे, सहाय्यक गट विकास अधिकारी शरद भोसले, सर्व खातेप्रमुख व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.