राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

    45

    ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गडचिरोली(दि.15ऑगस्ट):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली येथे पक्ष कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

    स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सकाळी ८:१० वाजता सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे Lजिल्हाध्यक्ष मा. रविभाऊ वासलेकर यांना सलामी देऊन रवी भाऊ वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला, या ध्वजारोहणाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती माननीय युधिष्टिर विश्वास प्रामुख्याने उपस्थित होते.
    ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष सोनाली ताई पुण्यपवार, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, युवा अध्यक्ष रिंकू पापडकर, गडचिरोली शहराध्यक्ष विजय धकाते, महिला शहराध्यक्ष मनिषा ताई खेवले, जिल्‍हा संघटन सचिव नरेंद्र भाऊ चन्नावार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. देविदास मडावी, न्याय विभागाचे उपाध्यक्ष पडघन साहेब, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस योगेश नांदगाये, सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्ष प्रमिला रामटेके, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख, जिल्हा कोषाध्यक्ष कबीर शेख, शहर संघटन सचिव अजय करपे, सेवादलाचे मलय्या कालवा, जुगनू पटवा, जितेंद्र मुप्पीडवार, संजय शिंगाडे, विनोद कोसरे, कपिल बागडे, दीपक कारपेनवार, रेखा बारापात्रे, अर्चना कोलते, डॉ. सौ. सुलोचना मडावी, मेघाताई कोलते, तुकाराम पुरनवार,व बरेच पक्षाचे कार्यकर्ते ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.