

🔸आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत
✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439
नाशिक(दि.18ऑगस्ट):-भारतीय हितरक्षक सभा भारत, हे एक राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे सामाजिक आणि शैक्षणिक संघटन आहे.शिक्षण अर्थकारण, स्वसुरक्षा आणि संविधान जोपासना या चार क्षेत्रात 365 दिवस कार्य करणारी सेवाभावी संघटना आहे
१५ आॅगस्ट २०२०-स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने भारतीय हितरक्षक सभा, भारत या सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेच्या माध्यमातून आणि आपल्या अनमोल सहकार्यातून इ.१०वी,११वी आणि १२वीत उत्तीर्ण झालेल्या “गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना” ०६ नोटबुक रजिस्टर आणि ०१ पेन. सिडको ,गंगापूर गाव ,खुटवड नगर,चिंचोळे गाव, मिलिंद नगर नाशिक या विभागात वितरण करण्यात आले.
मा. सभानायक कृष्णा शिंदे यांनी भारतीय हितरक्षक सभा, भारत या सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेने आता पर्यत केलेल्या कामाचा आढावा दिला तसेच संघटनेचा प्रमुख (शिक्षण, अर्थकारण स्वसुरक्षा आणि संविधान जोपासना ) उद्देश विध्यार्थीना समजून सांगितला.
मा. सभानायक किरण मोहिते सर यांनी विद्यार्थीना शिक्षण या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.शिक्षण आपल्याला संपूर्ण जीवनात प्रशिक्षण देते आणि आपल्या जीवन मार्गात भविष्यातील विकास आणि सुधारित कारकीर्द मिळविण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देते.आपली जीवन शैली तसेच आपल्या देशाची आर्थिक आणि सामाजिक वृद्धी या साठी शिक्षणाची आवश्यकता असते असं मत सरांनी व्यक्त केलं.
मा.जावेद सर संचालक सुपरक्लासेस यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. ज्ञान, कौशल्या,व्यक्तिमत्त्व निर्माण करुन प्रत्येकाच्या आयुष्यात सुधारणा करुन सभ्य मानवी जीवन तयार करण्यास शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे एखाद्या व्यक्तीस चांगले आणि वाईट बद्दल विचार करण्याची क्षमता देते असे मत सरांनी व्यक्त केले.
मा.सचिन तेजाळे सर संचालक, सी एस ऑइल इंडस्ट्रीज अॅक्वल लुबरीकंट्स यांनी समाज्यात ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी फक्त शिक्षण हेच समाधान आहे असे मत सरांनी व्यक्त केलं.
मा.सभानायक किरण मोहिते मा.सभानायक कृष्णा शिंदे सिडको,नाशिक, मा.सचिन जाधव-गंगापूर गाव ,मा.विकास रोकडे सभानायक सचिन भरीत-चिंचोळे गाव,मा.सभानायक तुषार दोंदे-खुंटवड नगर ,मा. दीपक आचालखब-मिलिंद नगर यांनी आप-आपल्याला विभागात सभानायकानी अतिशय सुंदर शैक्षणिक वितरण कार्यक्रमाचे नियोजन-आयोजन केले त्याबद्दल संघटनेच्या वत्तीने खूप खूप आभार.
*विशेष आभार* – *नाशिक येथील मा.सचिन तेजाळे सर संचालक, सी एस ऑइल इंडस्ट्रीज यांचे अॅक्वल लुबरीकंट्स हे ब्रँड नेम इंडस्ट्रियल आणि ऑटोमोबाइल ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी.,मा. जावेद सर संचालक सुपरक्लासेस,मा.रविकांत गौतम लेखक पुणे, अॅङ राहुल बनकर उल्लासनागर, ठाणे.*
*तसेच मा.दीपक गोसावी,मा. समाधान तिवडे सर, मा.अमोल घेगडमल,मा.दिलीप गांगुर्डे, मा.प्रवीण लोखंडे,मा.श्वेता मोहिते,मा.शरद गोरे,मा.अमित रंगारी,मा.सागर खरे, मा.नितीन पिंपळीसकर,विनोद साळवे सर,मा.आशिष गायकवाड, यावेळी उपस्थित होते*
*या मानवतावादी लोकांनी आर्थिक सहकार्य केल्यामुळे आपण गरजू मुलांना शैक्षणिक मदत पोहचू शकलो.अशा मानवतावादी लोकांचे संघटने तर्फे खूप खूप आभार स्वतंत्र दिन खऱ्या अर्थानं यशस्वी झाल्याचं समाधान विद्यार्थी व पालक ह्याच्या चेहर्यावर दिसून येत होतं.विद्यार्थ्यांना भविष्यात मार्गदर्शन व्हावं म्हणून भारतीय हितरक्षक सभेने विद्यार्थ्यांना आय कार्ड सुद्धा वितरित केले ज्याच्या माध्यमातून करीयर संधी,प्रेरणादायी विचार,अभ्यासाचे मूलमंत्र,अश्या वेगवेगळ्या बाबींसाठी भारतीय हितरक्षक सभा,भारत संघटना येणाऱ्या काळात सातत्याने काम करणार आहे.*