बीड जिल्हात एक दिवशीय पञकार प्रशिक्षण व चिंतन बैठकीचे आयोजन

6

आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.18ऑगस्ट):-बीड  जिल्हातील शाखा बीड जिल्हा पुरोगामी पञकार संघाकडून पञकारांंसाठी एक नवे ध्येय आणि धोरण याबद्दल प्रशिक्षण व चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हातील या प्रशिक्षण व चिंतन बैठकीला सर्वांचीच उपस्थितीत राहाणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात संघाचे विजय सुर्यवंशी यांच्याआदेशानूसार संपुर्ण जिल्हात पञकरीता प्रशिक्षण व चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात पाच ते सहा महिण्यापासून कोरोना कोविड-19 रोगामुळे उध्वस्त व मृत्यूचे तांडव जन-सामान्यपासून ते श्रीमंतीमध्ये बल्लाढ शक्तिशाली असलेल्या उद्योगपत्ती , व्यापारीपर्यत रोगामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे , ही कोरोना कोविड-19 रोगाची भीती मनातून नष्ट केव्हा होईल याचा अंदाज लावणे अशक्य होय,

आज बीड जिल्हातच नव्हे तर राज्यात वेगवेगळे आरोप व हल्ले पञकारांंवर होत आहेत.बहुतांश पञकारांंची संख्या ही पुरुषांची आसल्यामूळे या कळपात महिला पञकार असेल तर त्या ” महिला पञकारांंना कोणीही मदतीसाठी धावून जात नाही. तर बघ्याची भूमिका म्हाणून पुरुष पञकारांंची पाहतांना दिसते.

एक पुरुष किंवा महिला पञकार या क्षेञामध्ये नवे विचार व नवे ध्येय नवी सामाजिक संकल्पना घेवून येतो तर त्याला हेच पञकार संधी देत नाहीत . ज्यांना तेथे संधी नाही त्यांना पुरोगामी पञकार संघ संधी देणार. पुरोगामी पञकार संघाकडून पञकारांंसाठी एक प्रशिक्षण नेमके का घेत आहोत. कारण आज पञकारावरील हल्ले, खंडणीचे गुन्हे, बहूंतांश निमशासकिय व शासकिय वरिष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मनमानी, व त्यांचा सार्वजनिक काम करताना येत असलेल्या अडी-अडचण तसेच राज्यात सतत पञकारांंवर होत असलेल्या हल्ले, शासकिय व निमशासकिय आणि राजकारणातील हस्तक्षेप होत असल्यामुळे योग्य न्याय मिळत नाही. याबद्दल पञकारांंना चिंतन बैठकीचे आयोजन कराण्यात आले आहे.

पुरोगामी पञकार संघाकडून बीड, धारुर, मांजलगाव, गेवराई , परळी-वै , अंबाजोगाई , वडवणी , केज, सिरसाळा आष्टी , पाटोदा या तालूक्यात संघाच्यावतीने शाखा कार्यरत आहेत . बीड जिल्हा पुरोगामी पञकार संघ शाखेच्यावतीने पञकार प्रशिक्षण व चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संघाचे भागवत वैद्य ( मुख्य-संपादक: युवती राज तथा राज्य-संघटक ) विजयकूमार व्हावळ ( मुख्य-संपादक: जय महाभारत तथा मराठवाडा-उपाध्यक्ष ) बीड जिल्हाध्यक्ष , कार्याध्यक्ष , सचिव, तसेच सर्व तालूका अध्यक्ष शहर-अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व तालूकाचे पञकार या बैठकीला उपस्थितीत राहणे बंधनकारक आहे असे बीड जिल्हा पुरोगामी पञकार संघाच्याकडून प्रसिद्धी पञकाद्वारे कळविण्यात आलेले आहे.