दोंडाईचा येथे बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघची बैठक

8

✒️नवनीत बागले(दोंडाईचा,विशेष प्रतिनिधी)मो:-8975147176

दोंडाईचा(दि.24ऑगस्ट):- येथे बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघची धुळे जिल्हा शाखा तर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक जिल्हा अध्यक्ष नवनीत बागले व परिवर्तनवादी पत्रकार संघ धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार प्रमुख उपस्थितीत तर कायदेशीर सल्लागार एडवोकेट संतोष भोई यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली होती. बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ विषयी आणि तरुणांमध्ये संघटनेविषयी कार्य जास्तीत जास्त वाढवावा म्हणून जिल्ह्यात,तालुक्यात तसेच ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी. श्री राजेंद्र आत्माराम चौधरी ( माळी),उपाध्यक्ष श्री.राजेंद्र श्रीराम पानपाटील, मालपुर कपिल लोटन इंदवे ,शिंदखेडा तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष रहीमपुरे ता ग्रामीण अध्यक्ष समाधान पाटील यांची निवड संस्थापकअध्यक्ष संजय रणदिवे यांच्या आदेशान्वये जिल्हा अध्यक्ष नवनीत बागले परिवर्तनवादी पत्रकार संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी संतोष कोळी यांनी मार्गदर्शन केले नवनियुक्त पद्धधिकार्याचे जिल्हा सरचिटणीस ओंकार पगारे, विजय कोळी, रहिम पुरे,ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश बेडसे, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील. शिंदखेडा तालुक्याचे सल्लागार अशोक भिकन तिरमले इत्यादींनी कौतुक केले आहे.