विद्युत वितरण कंपनीने तीनशे युनिट पर्यंत विज – गजानन पाटील चव्हाण प्रति महिना माफी करावे

9

🔸…अन्यथा न्यायालयात कंपनी व सरकारच्या विरोधात न्याय मागु

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.25ऑगस्ट):-तालुक्यासह खेड्या पाड्यातील मीटर धारकाला विद्युत वितरण कंपनीने तीनशे युनिट पर्यंत विज बिल दर महिना माफी द्यावे अन्यथा सरकारच्या विरोधात न्यायालयात दाद मागू असा ईशारा सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यानी एका निवेदना द्वारे दिला आहे.
संबंध जगामध्ये तसेच आपल्या भारत देशासह महाराष्ट्रामध्ये कोरोना या प्राण घातक भया वया महामारीमुळे या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने तथा महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन यांच्या आदेश नियम आटी घालून दिलेल्या लाॅकडाऊन घोषित केल्यापासून आज पर्यंत सर्व नागरिकानी काटेकोर पणे पालन केले आहे.
प्रशासनास नागरीकानी सहकार्य केले तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंब प्रमुखाने उत्पन्नासाठी विविध पर्याय शोधत बघत होता आणि रोजचा कामधंदा पूर्णता बंद झाल्याने उत्पन्न नाहीशे झाले तसेच या काळातील शेतकरी, शेतमजदूर, मध्यमवर्गीय व्यापारी बांधव, विविध कामगार, मुनीम बांधव,व सामान्य नागरिकसह इत्यादी
गेले पाच ते सहा महिन्या पासून विविध कामाचे व्यवसाय मजुरीचे घरामध्ये थांबले आहे.
त्यामुळे अजिबात उत्पन्न नाही पूर्ण काम व्यवसाय बंद असल्यामुळे तुटपुंजी घरातील पैशावर आपले व आपल्या कुटुंबाचे घरात राहून पोटाची खळगी भरणे शक्य नाही अतोनात गींती नसतांना ही अशा प्रकारची विज बिल विद्युत वितरण कंपनी विभागाने सर्वानांच बिले दिलेल्या आहेत हजारो रूपये बिल भरणे शक्य नाही मग हा गुन्हा कोणाचा असू शकतो जनतेचा का ? जनता कोणाकडे पहावे असे ही जनतेचे मत आहे.

निवेदनावर सह्या व निवेदक श्रीमती पार्वतीबाई शंकरराव पाटील चव्हाण नगर सेविका नायगाव, देवीदास पाटील बोमनाळे नगरसेवक नायगाव, शेख तबस्सुम फातेमा आरिफ नगरसेविका नायगाव, रघुनाथ तुकाराम दादा सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ता, भाऊराव मारोतराव पाटील चव्हाण सामाजिक कार्यकर्ता, गजानन शंकरराव
पाटील चव्हाण सामाजिक कार्यकर्ता, गंगाधर बापूराव कल्याण सामाजिक कार्यकर्ता, हरिश्चंद्र शंकराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ता, संजय तेजेराव पाटील चव्हाण सामाजिक कार्यकर्ता, कैलास सुभाष भालेराव सामाजिक कार्यकर्ता, सय्यद येज्जास सामाजिक कार्यकर्ता, राजेंद्र सोनकांबळे, माधव वसंत चव्हाण, चंद्रकांत तमलुरे, प्रदीप देमेवार, अतुल मंगरुळे,अविनाश चव्हाण, संजय गुजलवार या सर्व कार्यकर्त्यांनी सह्या केल्या आहेत आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले