✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.२९ऑगस्ट):- येथील अक्षय लांजेवार यांची समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विविध शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्रात कार्यरत आहे.
अक्षय लांजेवार यांचे विद्यार्थी संघटन, नेतृत्व गुण, सामाजिक कार्य, मनमिळावू स्वभाव व सामाजिक समस्येबाबत जागृत व सामाजिक धडपड पाहून त्यांची निवड समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी केली आहे.
समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी अक्षय लांजेवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल शुभम सोनवणे, चिरायू बारेकर, सावंत झोडपे, शुभम खोब्रागडे, अनिकेत संगमावर, पराग खाटे, प्रतिक तालेवार, निखील मडावी, सोमेश थुटे, अक्षय भरडकर, राहुल मडावी, जयवंत वरघने, वैभव लांडगे आदींनी अभिनंदन केले आहे.
अक्षय लांजेवार यांनी विद्यार्थांच्या समस्येसोबतच सामाजिक उपक्रम राबवून परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय व्हावे अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांनी केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED