🔸रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अर्जुन चाटे यांचे नेतृत्व

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)-मो:-9075913114

अंबेजोगाई(दि.29ऑगस्ट):- तालुक्यातील सर्व हक्काच्या योजना या प्रश्नावर रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन चाटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
तालुक्यातील निराधार लोकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावा, अपत्रा लाभार्थी रद्द करा, दोषींवर गुन्हे दाखल करा, खताचा काळा बाजार थांबून रास्त दरात खते मिळाली पाहिजे,सरकारने बंदी घालण्यात आलेल्या कीटक नाशक औषधी शासन जमा करून शेतकरी बांधवांना मोफत देण्यात यावे,बियाणे न उगवल्याने शेतकरी बांधवाना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई मिळावी,
दीव्यांग बांधवांना पस्तीस किलो धान्य व राशन किट तात्काळ घरपोच द्या, अमलबजावणी न करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी,तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर सर्व कुटुंबाला किराणा साहित्य वाटप करण्यात यावे अनेक योजनेचे पैसे शिल्लक असून ते वापरण्यात यावे,तालुका कृषी अधिकारी यांच्या मनमानी कारभार सुरू असून तत्काळ बदली करण्यात यावी,राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी ,कोरोना काळात मंत्री मंडळ यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोना रुग्ण जागेवर स्थानबद्ध न केल्यामुळे सामान्य माणसाला होणारा त्रास थांबवा,दोन्हीही सरकार कर्ज माफीचा डांगोरा करत असून अनेक वर्षांच्या छोट्या व अनेक कर्जदाराला कर्ज माफी न देता फसवणूक थांबवा व सरसकट सगळ्या शेतकरी बांधवांना सातबारा कोरा करून पीक कर्ज तत्काळ वाटप करून शेतीसाठी विविध कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, मागण्याचे निवेदन रयत शेतकरी संघटनाअंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुन चाटे यांच्या हस्ते तहसिलदार यांना देण्यात आले.

महाराष्ट्र, मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED