✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.29ऑगस्ट):-तालुक्यातील मौजा नवतऴा येथील एका १३ वर्षीय मुलीची छेड काढणारा आरोपी शैलेश मोहनलाल रामटेके पिंपळगाव याला भिसी पोलीसांनी दि. १४ ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर भिसी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता वरोरा येथील विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आरोपीची दि. २९ ऑगस्टला विशेष सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करून सुटका केली.

सविस्तर वृत्त असे की, चिमूर तालुक्यातील मौजा नवतऴा येथील एका १३ वर्षीय मुलीची छेड काढणा-या आरोपीला भिसी पोलीसांनी दि. १४ ऑगस्टला अटक करून आरोपीविरुद्ध अपराध क्र. १५४/२०२० नुसार गुन्हा नोंद करून भा.द. वी. चे कलम ३५४ (ब), ४४८ व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो कायदा) अन्वये कारवाई केली होती. त्यानंतर भिसी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता वरोरा येथील विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

त्यानंतर वरोरा येथील विशेष सत्र न्यायालयात अधिवक्ता अँड. शनैशचंद्र जि. श्रीरामे यांच्या मार्फतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता व त्यानंतर न्यायालयाने आरोपीची १० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करून आरोपीची सुटका केली.

क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED