पुरामुळे वैनगंगा नदीकाठच्या गावांना मोठा झटका

    41

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.२९ऑगस्ट):- एकीकडे कोरोनाची महामारी आणि दुसरीकडे पुरामुळे होणारी मोठी हानी या दोहोंच्या मधात फसलेला शेतकरी. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे सोडले असल्याने वैनगंगा नदीकाठच्या असलेल्या सर्व गावांना मोठा झटका बसलेला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील अरहेर – नवरगाव, पिंपळगाव(भोसले) , बेळगाव कोल्हारी हे गाव पूर्णपणे पुराच्या पाण्याने घेरलेले आहेत. अरहेर – नवरगाव,पिंपळगाव(भोसले) हे गाव पालेभाज्या साठी धानाच्या शेती साठी खूप प्रसिद्ध आहेत. तरी या पुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आणि पूना पुराचे थांबण्याचे काही ठिकाण दिसत नसल्यामुळे नदीकाठच्या गावतील लोकांनी सतर्क राहावे. व शासनाने तातडीने लक्ष्यापूर्वक नदीकाठच्या गावां कडे लक्ष्य द्यावे . व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तसेच गावातील घरांचे नुकसान झाले. त्यांना त्वरित मदत करावी.