🔹नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्क राहण्याचेही आवाहन केले

✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

आल्लापल्ली(दि.2सप्टेंबर):-पुरामुळे शेतात पाणी शिरल्याने व नदी नाल्यांच्या किनारपट्टीवरील वस्तीत धोका निर्माण झाल्याने माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार 1 सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूर ओसरताच नुकसानीचे तात्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

पूर ग्रस्त भागाची पाहणी करतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम होते.
गोसेखुर्द धरणाच्या पाणी विसर्गामुळे जिल्ह्यात व सोबतच अहेरी तालुक्यात पुराचा फटका बसला आहे. अहेरी तालुक्यातील नदी व लहान-मोठे नाल्या काठावरील शेती व वस्तीला धोका निर्माण झाले असून शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर परिस्थितीच्या पाहणी दरम्यान पुरपीडित नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन आस्थेने विचारपूस केले व हिंम्मत दिले.

यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दीना नदीवर व लगतच्या दीनाचेरपल्ली, महागाव बुजुर्ग व महागाव खुर्द, वांगेपल्ली, गडअहेरी, अहेरीतील माता मंदिर परिसर आदी पूरग्रस्त भागात भेटी देऊन पाहणी केले व नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करून सतर्क राहण्याचे यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी आवाहनही केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगर सेवक अमोल मुक्कावार, नायब तहसीलदार फारुख शेख, नगर सेवक जावेद शेख, मखमुर शेख, आदित्य जक्कोजवार, मारोती आत्राम आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED