जावली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपाई च्या एकूण १४ उमेदवारांनी मारली बाजी

30

✒️जावली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

जावली(दि.२५जानेवारी):- रिपाईच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा रिपाई चे जिल्हाध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार व पेढे देऊन सत्कार करण्यात आला .
रिपाई (आ ) चे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुक्यातील अनेक ग्रामपंच्यातीमध्ये आरक्षित जागेवर रिपाई चे उमेदवार उभे करण्यात आले होते त्यापैकी १४ ठिकाणी उमेदवार निवडून आले.

जावली तालुक्यात रिपाई च्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत असल्याने गावागावात मोठ्या प्रमाणात संघटन वाढवून कार्यकर्त्यांनी तालुक्यात ४२ शाखा निर्माण केलेल्या आहेत , समाज्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांच्या विरोधात रिपाई नेहमी रस्त्यावर उतरून काम करत असल्याने जावली तालुक्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात रिपाई ( आ ) च्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रिपाईला प्रथमच मोठे यश मिळाले आहे.

याप्रसंगी अशोकराव बापू गायकवाड , जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे , जिल्हा उपाध्यक्ष शशी जाधव , किसनराव रोकडे , जॉन जोसेफ , तालुका उपाध्यक्ष हेमंत गायकवाड , विकास जाधव , अनिल शिंदे ,तालुका संघटक विजय शिंदे , बळवंत बगाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .