जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्ली येथे आगळावेगळा उपक्रम

35

जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्ली येथे समूह साधन केंद्र मोहगाव तील्ली च्या वतीने माननीय आर .आर. अगडे सर, केंद्रप्रमुख यांनी घडवून आणला आगळावेगळा उपक्रम…

समूह साधन केंद्र मोहगाव अंतर्गत येणाऱ्या एकूण १२ शाळा आणि येथे कार्यरत असलेल्या एकूण २१ स्वयंपाकी महिला यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम..

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवडावा
पाव्यातला सुर जैसा ओठातूनी ओघडावा !!

स्वतःच्या मुलाप्रमाणे निरागस विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या आणि शाळेतील एक अविभाज्य घटक असणाऱ्या स्वयंपाकी स्त्रिया जी वर्षभर निस्वार्थ सेवेने मुलांसाठी स्वयंपाक करून त्यांची काळजी घेतात. दिवसभर शाळेत राहून मुलानप्रती व शाळेप्रती निष्ठा अवर्णनीय आहे.प्रेमाने स्वयंपाक करत आनंदाने चिमुकल्या विद्यार्थ्याना भरवतात .त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आगळावेगळा कार्यक्रम माननीय आर. आर . अगडे सर यांच्या संकल्पनेतून साकार झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आर. एच. नंदेश्वर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ.आशाताई अगडे, मोनाली अगडे, कु.पी.एम. हुमे मॅडम मुख्याध्यापिका केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्ली, तसेच मार्गदर्शक आर. आर. अगडे सर , तसेच २१ स्वयंपाकी महिला ह्या सत्कार मूर्ती होत्या .आजच्या या कार्यक्रमात स्वयंपाकी महिलांचा सत्कार नऊवारी साडी आणि साधी साडी देऊन एक अनोखा आदर्श अख्या महाराष्ट्र समोर केंद्रप्रमुख अगडे सरांनी ठेवला. त्यांच्या निस्वार्थ सेवेत शाळे प्रति असणारी आस्था ही जगाला माणुसकी शिकवते. संपूर्ण गावातील मुले ही आपली मानून कार्य करणारा हा वर्ग जगाला प्रेमाचे धडे शिकविते यांचा हा सत्कारामुळे त्यांना पुढील कार्य करण्यास निराळीच ऊर्जा मिळाली. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सौ. आशाताई अगडे यांनी सेवाभाव हा सर्वात मोठा दागिना असतो! सेवेतून ईश्वरसेवा साधली जाते, असे मत आपल्या बोलण्यातून व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदेश्वर सर यांनी प्रथमच महाराष्ट्रात हा अनोखा उपक्रम पाहिल्याचे बोलले,,स्वयंपाकी या घटकाकडे कुणी एवढ्या कृतज्ञ नजरेने आणि त्यांच्या सत्कार करणारा हा कार्यक्रम निश्चितच मनाला मोठे
करणारा आहे !
मा. अगडे सरांनी स्वखर्चातून 21 स्वयंपाकी महिलांकरिता नववारी साडी आणि साधी साडी सत्कार पूर्वक देऊन सन्मान केला.. कार्यक्रमाचे संचालन मासुरकर मॅडम यांनी केले तर आभार राऊत मॅडम यांनी मानले.याप्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले . मास्क व सनीटायझर याचा वापर करण्यात आला. गर्दी टाळण्यात आली. कृतज्ञता व्यक्त करणारा एक
मोठा आदर्श आमच्या सर्वां समोर ठेवण्यात आला. मा.अगडे सरांच्या दातृत्वाला आणि कार्यास कोटी कोटी प्रणाम!!!

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती
देखने ती जीवने ती तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाण्यासारखे..

✒️लेखक:-राजेंद्र बंसोड(स. शिक्षक,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा)पंचायत समिती गोरेगाव,जिल्हा परिषद गोंदिया