वृक्षारोपण संवर्धनाचा घेतला संकल्प

37

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21जुलै):-वृक्षारोपण संवर्धन करणे किती गरजेचे आहे हे कोरोनाच्या आजाराने मानवाला एक संदेश दिला आहे. आज ऑक्सिजन मनुष्य,प्राणिमात्रा ला महत्वाचे आहे त्यामुळे वृक्षाचे महत्व जगाला पटलेले आहे.भारतीय परिवार बचाव संघटने तर्फे वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष संवर्धनाचा संकल्प सर्व सदस्यां कडून वदवून घेतला.कार्यक्रमाला भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सचिव सुदर्शन नैताम,सचिन बरबटकर,डॉ राहुल विधाते,गंगाधर गुरनुले, नितीन चांदेकर,किशोर जम्पलवर,गौरव आक्केवार,स्वप्नील सुत्रपवर,नंदू गणवीर,स्वप्नील गावंडे,ऍड धीरज ठवसे,विजय ठाकरे,विवेक मून,अथर्व आक्केवार आदी उपस्थित होते.

तुकाराम महाराजांनी त्या काळातही वृक्षाचे महत्व जाणिले होते.”वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी”जहाँ हरियली वहा खुशहाली”वृक्षामुळे ऑक्सिजन भरपूर व मुबलक प्रमाणात कोणताही भेदभाव न करता मुक्त मिळतो.कोरोना मुळे ऑक्सिजनचे महत्व पटलेले आहे.वृक्षाचे महत्व जाणून घेऊन प्रत्येकाने आपले कुटुंबाप्रति,समाजाप्रती,देशाप्रती आपले दायित्व समजून एक वृक्ष लावावे व त्याच्या संवर्धनाची जवाबदारी घ्यावी,एक मूल एक वृक्ष,समाजाप्रती व्हा दक्ष.मी समाजातील एक जागरूक नागरिक आहे भविष्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून एक वृक्ष लावून संवर्धन करू या असा संकल्प घेण्यात आला.