गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी जास्तीचा वेळ द्यावा – आ.सुरेश धस

33

🔸लातूर प्रमाणेच आष्टी चा सुद्धा पँटर्न निर्माण व्हावा

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.21जुलै):-जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेनंतर दोन तास जास्त शिक्षण दिले तर काय होईल? लातूर सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आठ – आठ दिवसाला परिक्षा घेत आहेत.ते लातूरला शक्य आहे तर आष्टीच्या शिक्षकाला का?जमत नाही.आष्टीची गुणवत्ता अजून वाढविण्यासाठी शिक्षकांनी आपला जरा जास्तीचा वेळ द्यावा असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

        राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून आष्टी तालुक्यातील दहावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आष्टी येथील लक्ष्मी लाॅन्स येथे आज बुधवार दि.२१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ.सुरेश धस बोलत होते.यावेळी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे,वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,आष्टी तालुका दुध संघाचे व्हा.चेअरमन आत्माराम फुंदे,कु.आरती ससाणे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,गुणवंतामध्ये मी मुलींचे कौतुक करणार आहे.आज एकशे वीस गुणवंतापैकी ७५ विद्यार्थ्थीनी आहेत.आज आपल्याला समाजात बसविण्याचे काम क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांनी केले आहे.

आज समाजामध्ये महिलांची उजवी बाजू होत आहे.प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे दिसत आहेत.तालुक्यातील वसुंधरा शाळेतील १०० टक्के मार्क घेणारे १५ मुले आणि जि.प.कन्या शाळेच्या ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या १६ मुली आणि गणेश विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी आऊटआँफ मार्क घेतले आहेत.अशा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे.या यशाचे गमक त्या शाळेतील शिक्षकापासून शिपाई पर्यंत सर्वांचे यश आहे.मी लातूर पॅटर्नला विरोध करणार नाही.लातूर पॅटर्न हा लातूर पॅटर्न आहे.पण लातूरला विद्यार्थ्यांची दर आठ दिवसाला परिक्षा घेत असतात आणि आष्टीच्या शिक्षकांनीही तर शाळेव्यतीरिक्त दोन तास जास्त वेळ दिला तर काय हरकत आहे.आपणही जर प्रयत्न केला तर गुणवंतेचा आपला पॅटर्न तयार होईल आणि आपला आष्टी पॅटर्न करण्यासाठी सर्व शिक्षकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
———
एकशे वीस गुणवंताचा सन्मान
दहावीच्या परिक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सुमारे एकशे वीस विद्यार्थी-विद्यार्थींनीचे आमदार सुरेश धस यांनी फेटे बांधून प्रशिस्तीपञ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
————–
सव्वा लाख झाडे लावणार
राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यात सव्वालाख वृक्ष लागवड करणार असून,लावलेल्या झाडांचा संभाळ सुध्दा करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगीतले.