खेळाडु अविनाश साबळे यांच्या मांडव्यातील राहत्या घरी जाऊन मातापित्यांचा केला मा.आ.भीमसेन धोंडे यांनी गौरव

31

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.21जुलै):-अत्यंत गरीब आणि मागासावर्गीय कुंटुंबातील तरुण मुलगा आमच्या संस्थेच्या कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचा एस.वाय., बी.ए.या वर्गात अॕडमिशन असलेला सध्या तो महार रेजिमेंटमधील हवालदार असणारा अविनाश साबळे आता ऑलम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करीत आहे. मांडव्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा आणि भारताचा हिरा म्हणुन देश आज त्याच्याकडे पाहत आहेत.अविनाश हा भारताची शान आणि मान जगात उंचवणार आहे.शंभटक्के तो पदक पटकावणारच अशी मला खात्री आहे असा आत्मविश्वास राष्ट्रीय खेळाडु,क्रिडाप्रेमी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केला.

आष्टी तालुक्यातील मांडवा येथे सौ.वैशाली साबळे,मुकींदा साबळे या खेळाडु अविनाश साबळे यांच्या आई वडीलांचा राहत्या घरी जाऊन धोंडे यांनी गौरव केला.यावेळी ते बोलत होते.यावेळी अशोक साळवे,चेअरमन पोपट मुटकुळे,पत्रकार उत्तम बोडखे,ग्यानबा साळवे,सीताराम वीर हे उपस्थित होते.
जपान देशातील टोकियो शहरात दि.२३ जुलैपासुन सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आष्टी तालुक्यातील मांडव्याचा सुपुत्र चमकदार कामगिरी करणार आहे.या त्याच्या स्पर्धेकडे भारताचे लक्ष लागलेले आहे.या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झालेले आहेत.यापैकी तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे पात्र ठरला आहे.अविनाश साबळे यांना जास्तीत जास्त पदके मिळण्यासाठी देशवासीयांकडुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आष्टी तालुक्यातील साधारणपणे दिड हजार लोकसंख्या असलेलं मांडवा हे अहमदनगर – बीड राज्य महामार्गावर हायवेपासून ५ कि.मी. अंतरावर आतमध्ये असलेलं खेडेगाव आहे.याच गावात सामान्य शेतकरी आणि विटभट्टी कामगाराच्या कुटुंबात जन्म घेतलेला अविनाश साबळे आहे.तो भारतीय सैन्यात महार बटालियनमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत.मांडव्यातील जि.प.प्राथमिक शाळेत चौथीपर्यत शालेय शिक्षण घेतले.त्यानंतर बारावीपर्यंत आष्टी येथे सहा कि.मी.पायी चालत त्यांनी शिक्षण घेतले.आता सध्या कडा येथील धोंडे यांच्या संस्थेच्या आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात सेंकड एअरला अॕडमिशन आहे.कष्ट करण्याची तयारी व शिकण्याची आवड यामुळे शिकण्याची नाळ तुटू दिली नाही.त्याला आई वडिलांनीही साथ दिली.बारावी उत्तीर्ण होताच वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी अविनाश सैन्यात भरती झाला.भरती होताच त्याची बदली बर्फाळ भागातील सियाचीन ग्लेशियर या ठिकाणी झाली.

सियाचीनमध्ये सहा महिने काम केल्यानंतर राजस्थानमध्येही त्याने आपली ड्युटी केली.राजस्थानमधुन दोन वर्षानंतर अविनाशची सिक्कीममध्ये बदली झाल्यानंतर तिथे २०१५ मध्ये इंटर आर्मी स्पर्धेत सहभाग घेऊन क्रॉस कंट्रीमध्ये तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.त्याने स्टीपलचेज या खेळासाठी अमरीश कुमार यांचे मार्गदर्शन घेतले आहे.तीन हजार मिटर धावण्याच्या (हार्डल जंप,वॉटर जंप) अशा स्टीप्लचेज गेममध्ये सहभाग घेऊन दोहा एशियन गेम्समध्ये ३७ वर्षांचा राष्ट्रीय विक्रम अविनाशने तोडला.महार रेजिमेंटमधील हवालदार असणारा अविनाश साबळे आता ऑलम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करीत आहे.अविनाश हा भारताची शान आणि मान जगात उंचवणार आहे.शंभटक्के तो पदक पटकावणारच अशी मला खात्री आहे असे शेवटी मा.आ.भीमसेन धोंडे म्हणाले.